Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जेट, इंडिगो, स्पाईसजेटला २५८ कोटींचा दंड

जेट, इंडिगो, स्पाईसजेटला २५८ कोटींचा दंड

=कोर्टात आव्हान देण्याची कंपन्यांची तयारी=
spicejet-indigo-jetairwaysनवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – एअर कार्गो वाहतुकीसाठी गट तयार करून हवाई इंधन सरचार्ज ठरविल्याचा ठपका ठेवत भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) जेट, इंडिगो आणि स्पाईसजेट या तीन हवाई कंपन्यांना २५८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान, या कंपन्यांनी आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे धोरण स्वीकारले आहे.
हवाई वाहतूक क्षेत्रात सुरू असलेल्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सीसीआयने मंगळवारी जेट, इंडिगो आणि स्पाईसजेट या तीन विमान कंपन्यांना २५७.७१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एअर कार्गोवरील इंधनाचा सरचार्ज परस्पर ठरविणार्‍या ज्या कंपन्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यात एअर इंडिया आणि गो एअर कंपनीचाही समावेश होता. पण, या कंपन्यांवरील आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
जेट एअरवेजला १५१.६९ कोटी, इंडिगोला ६३.७४, तर स्पाईसजेटला ४२.४८ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या विमान कंपन्या गट तयार करून हवाई इंधनावर एकसमान पद्धतीने सरचार्ज आकारत होत्या. एअर कार्गो वाहतूक दरांवर याचा परिणाम झाल्याचे आयोगाला चौकशीत आढळून आले. यामुळे देशाचा आर्थिक विकास आणि ग्राहकांच्या हितावर परिणाम होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25532

Posted by on Nov 18 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1217 of 2453 articles)


=चीनचा अमेरिकेला इशारा= बीजिंग, [१८ नोव्हेंबर] - दक्षिण चीन समुद्रातील वादात अमेरिकेने अजिबात पडू नये. या समुद्रापासून दूरच राहावे, असा ...

×