Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » जेट-इतिहाद कराराचेही दस्तावेज ‘लिक’

जेट-इतिहाद कराराचेही दस्तावेज ‘लिक’

=सीबीआयचा आणखी एक खळबळजनक खुलासा=
cbiनवी दिल्ली, [१६ मार्च] – कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरणाचा तपास करणार्‍या सीबीआयने आज सोमवारी आणखी एक खळबळजनक खुलासा केला असून, जेट आणि इतिहाद या विमान कंपन्यांमध्ये झालेल्या २०५८ कोटींच्या कराराला मंजुरी देण्याविषयीच्या दस्तावेजांची चोरी झाल्याचे उघडकीस आणले आहे.
मंत्रालयांमधील हेरगिरीचे प्रकरण केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या कल्पनेपेक्षा जास्त विस्तारित असल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट होत आहे. जेट-इतिहाद कराराला मान्यता देण्यासाठी परराष्ट्रीय गुंतवणुकीला चालना देण्याविषयक मंडळाने तयार केलेले दस्तावेज वित्त मंत्रालयातून आधीच फुटल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या करारानंतर, नागरी विमान वाहतूक क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर नेण्यात आली होती. त्याशिवाय, भारतीय विमान वाहतूक कंपन्यांमध्ये समभाग खरेदीसही परवानगी देण्यात आली होती. जेट-इतिहाद हा करार मंजूर होईपर्यंत अनेक वाद निर्माण झाले होते.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या करारासंदर्भातील अर्थ मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालय, एफआयपीबी, सेबी यांच्यादरम्यानचा संपूर्ण पत्रव्यवहार आणि या कराराशी संबंधित सर्व कायदेशीर दस्तावेज लिक झाले आहेत. यासाठी मंत्रालयातील पदाधिकारी, खाजगी सल्लागार आणि मध्यस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. या वादग्रस्त कराराच्या विरोधात भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
याप्रकरणी सध्या अटकेत असलेले अधिकारी आणि सल्लागारांनी, आपण आणखी बर्‍याच महत्त्वाच्या करारांसंदर्भातील कागदपत्रे याच पद्धतीने लिक केली असल्याची माहिती दिली आहे. हे कृत्य त्या करारांना मंजुरी किंवा ते रद्द होण्यापूर्वी केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी येत्या काही दिवसात आणखी अधिकार्‍यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे सीबीआयच्या सूत्राने स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21506

Posted by on Mar 17 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य (1898 of 2453 articles)


मुंबई, [१६ मार्च] - राज्यासाठी कायदे तयार करणार्‍या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे कामकाज कसे चालते याची सर्वसामान्यांना असलेली उत्सुकता आता संपली आहे. ...

×