Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जैशचा म्होरक्या मसूद अझर जेरबंद

जैशचा म्होरक्या मसूद अझर जेरबंद

  • अनेक अतिरेक्यांनाही बेड्या ठोकल्या
  • कार्यालयांनाही केले सील
  • पाकने सुरू केली कारवाई
  • पठाणकोटला पाठविणार विशेष तपास पथक

Masood Azhar- Jaish-e-Mohammadइस्लामाबाद, [१३ जानेवारी] – पठाणकोट येथील वायुसेनेच्या हवाई तळावर २ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर कारवाई करताना पाकिस्तान पोलिसांनी आज बुधवारी जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझरसह अनेक अतिरेक्यांना अटक करून त्यांची कार्यालयेही सील केली आहेत.
पठाणकोट हल्ल्यात जैशचाच हात असल्याचे ठोस पुरावे गोळा केल्यानंतर भारताने ते पुढील कारवाईसाठी पाकला सोपविले होते. पाक अतिरेक्यांविरुद्ध कोणती कारवाई करते, यावरच १५ जानेवारी रोजीच्या भारत-पाक विदेश सचिव स्तरावरील चर्चेचे भवितव्य अवलंबून असल्याने आणि त्यातच चर्चा रद्द होऊ शकते किंवा लांबणीवर पडू शकते, असे संकेत असतानाच, पाक पोलिसांनी आज सकाळपासूनच जैशच्या अतिरेक्यांविरुद्ध पंजाब प्रांताच्या बहावलपूर आणि गुजरानवाला या दोन जिल्ह्यांमध्ये जोरदार मोहीम उघडली. या कारवाईत मौलाना मसूद आणि त्याच्या अनेक सहकारी अतिरेक्यांना अटक करण्यात आली. मसूदच्या भावाचीही कसून चौकशी केल्यानंतर त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या. सायंकाळी उशिरापर्यंत अटकसत्र सुरू होते, असे जियो न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. या कारवाईच्या काळात एकूण १२ अतिरेक्यांना अटक करण्यात आली असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
पठाणकोट हल्ल्यात जैशचाच सहभाग असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले असल्याने, मौलाना मसूद आणि त्याच्या भावासोबतच अटक झालेल्या अतिरेक्यांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणी भारतीय तपास संस्थांना सहकार्य करता यावे यासाठी पाकला आणखी पुराव्यांची गरज असून, ते प्राप्त करण्यासाठी विशेष तपास पथक पठाणकोटला पाठविण्याचा पाक सरकारचा विचार आहे.
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आज सकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत आयबी, आयएसआय आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भारतीय पुरावे आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईसोबतच, विदेश सचिव स्तरावरील चर्चेच्या भवितव्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्राने दिली.
पठाणकोट येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाककडून सुरू असलेल्या कारवाईवर आमची बारीक नजर आहे. पाक या हल्ल्यातील सूत्रधारांविरुद्ध कडक कारवाई करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मौलाना मसूदची अटक ही चांगलीच बातमी आहे. पण, तो देखावा ठरायला नको, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26520

Posted by on Jan 14 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (915 of 2458 articles)


=इंग्रजी वृत्तपत्राचा दावा= नवी दिल्ली, [१३ जानेवारी] - गेल्या २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचा दौरा संपवून अचानक ...

×