Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘जॉन्सन बेबी पावडर’वर संक्रात

‘जॉन्सन बेबी पावडर’वर संक्रात

Johnsons-Baby-Powderमुंबई, [९ मार्च] – ‘जॉन्सन पावडर’ वापरल्यामुळे अमेरिकेतील एका महिलेला कॅन्सर होऊन मृत्यू झाल्याचे उदाहरण ताजे असताना आता महाराष्ट्रातही ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन बेबी पावडर’वर संक्रात आली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने बेबी पावडरसह या कंपनीच्या अन्य उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ‘जान्सन ऍण्ड जॉन्सन बेबी पावडरचे नमुने पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. या कंपनीची उत्पादनं महाराष्ट्रात लोकप्रिय असून याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. त्यामुळे लोकांच्या आरोग्याबाबत कोणताही धोका होऊ नये म्हणून जॉन्सच्या उत्पादनांची तपासणी करण्याचे ठरविले आहे. याबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांशीही आम्ही बोलत आहोत, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. जर या तपासणीत ही उत्पादनं ‘निकृष्ठ’ ठरली तर या उत्पादनांवर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27144

Posted by on Mar 10 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (724 of 2451 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - विविध संघटनांचा दबाव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेमुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ...

×