Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश

ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी कालवश

SAEED-JAFARIमुंबई, [१६ नोव्हेंबर] – बॉलिवूडमध्ये अनेक अजरामर भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे आज वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. सईद जाफरी यांची पुतणी शाहीन अग्रवाल हिने फेसबुकच्या माध्यमातून ही दुःखद बातमी दिली.
भारतीय आणि ब्रिटिश चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे ज्येष्ठ आणि चरित्र अभिनेते सईद जाफरी यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटाने आपला लाडका ‘चाचा’ गमावला अशी भावना व्यक्त केली जात आहे. जाफरी यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गांधी, दिल, अजूबा, राम तेरी गंगा मैली यासारख्या अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
जाफरी यांनी अभिनेत्री आणि लेखिका मेहरुनिमा (माधुरी जाफरी) यांच्याशी लग्न केले होते. मात्र त्याचं हे लग्न १९६५ मध्ये मोडलं. त्यांना मीरा, जिआ आणि सकीन या तीन मुली आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25495

Posted by on Nov 17 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1228 of 2452 articles)


=आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली चर्चा= नवी दिल्ली, [१६ नोव्हेंबर] - नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांना सत्तासिंहासनापर्यंत पोहोचविण्यात महत्वपूर्ण ...

×