Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ज्येष्ठ नागरिकांसाठी ९० आरक्षित लोअर बर्थ

ज्येष्ठ नागरिकांसाठी ९० आरक्षित लोअर बर्थ

suresh-prabhuनवी दिल्ली, [२६ मार्च] – यापुढे प्रत्येक ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ९० आरक्षित लोअर बर्थ असतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डातर्फे नुकतीच करण्यात आली आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे वारंवार याबाबतची मागणी केली जात होती. त्यामुळेच रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला प्रतिसाद देत रेल्वे अर्थसंकल्पात हा कोटा वाढवला आहे, असे रेल्वे बोर्ड सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे ५० टक्क्यांनी आरक्षण वाढवण्यात आले आहे. त्यानुसार येत्या १ एप्रिलपासून हा निर्णय प्रत्यक्षात आणला जाईल, असे जमशेद यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलासुद्धा या आरक्षणाचा फायदा घेण्यास पात्र असतील.
२००७ पासून आरक्षित जागांची सुरुवात झाली होती. स्लीपर डब्यात एकून २ लोअरबर्थ आरक्षित ठेवले जात होते. त्यानंतर या आरक्षणात वाढ करून स्लीपर डब्यात २०१५ पासून ४ लोअरबर्थ आरक्षित करण्यात आले. आता ही संख्या ६ वर नेण्यात आली आहे तसेच ३ टीयर आणि २ टीयर एसीच्या प्रत्येक डब्यात तीन लोअर बर्थ आरक्षित करणत आले आहेत. पूर्णपणे वातानुकुलित असणार्‍या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात तीन लोअर बर्थ आरक्षित केले जाणार आहेत

Short URL: https://vrittabharati.in/?p=27591

Posted by on Mar 27 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (566 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२६ मार्च] - उघड्यावर शौच व मूत्र विसर्जन करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणे यापुढे खूप महागात पडू ...

×