Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण कालवश

ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण कालवश

R K LAXMANपुणे, [२६ जानेवारी] – ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांचे आज (सोमवार) वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
आर. के. लक्ष्मण यांचा व्यंगचित्रातील ‘कॉमन मॅन’ चांगलाच गाजला. फ्री प्रेस जर्नल्सपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर अर्धशतकभर ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत राहिली. आर. के. लक्ष्मण यांना आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि मॅगसेसे पुरस्कारांनी त्यांच्या कलेचा गौरव करण्यात आला होता.
घटनांचे अचूक टिपण, उत्तम निरीक्षण, बुद्धिमत्ता, आत्मविश्वास याच्या जोरावर लक्ष्मण यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे कायमच चर्चेत राहिली. कॉमन मॅन घडविणारा व्यंगचित्रकार हरपल्याने सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20067

Posted by on Jan 27 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (2170 of 2453 articles)


सात वर्षांची कोंडी फुटली तीन स्मार्ट सिटीजच्या विकासात सहकार्य, हॉटलाईन स्थापन करणार नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - भारत आणि ...

×