Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन कालवश

ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन कालवश

Ravindra-Jainमुंबई, [९ऑक्टोबर] – ज्येष्ठ संगीतकार व गायक रवींद्र जैन यांचे आज शुक्रवारी लिलावती रूग्णालयात निधन झाले आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मूत्रपिंडाच्या आजाराने ते आजारी होते. आज दुपारी त्यांची प्रकृती खालावली व ४ वाजून १० मि. त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.
रवींद्र जैन हे एका कार्यक्रमानिमित्त गेल्या शनिवारी नागपूरमध्ये आले होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूरमध्ये धंतोलीतील प्लॅटिना रूग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना वोक्हार्ट रूग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवले होते. मात्र प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याने त्यांना हवाई रूग्णवाहिकेने मुंबईत लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले.
रवींद्र जैन यांनी १५० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यात चोर मचाये शोर, चितचोर, राम तेरी गंगा मैली अशा गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्यांनी रामायण, श्रीकृष्ण, हनुमान यासारख्या टीव्ही मालिकांनाही पार्श्‍वसंगीत दिले आहे. या योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे रामायण मालिकेतील आवाजामुळे व आपल्या सुमधुर संगीतामुळे ते लोकप्रिय झाले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25080

Posted by on Oct 10 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (1351 of 2453 articles)


=पंतप्रधानांची जोरदार टीका= मुंगेर, [८ ऑक्टोबर] - पाच टप्प्यांत होणार्‍या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १२ ऑक्टोबरला होणार्‍या मतदानासाठी आता ...

×