Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » झुकेरबर्ग भारतात येऊन साधणार संवाद

झुकेरबर्ग भारतात येऊन साधणार संवाद

mark_zuckerbergनवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] – फेसबूकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग येत्या २८ ऑक्टोबरला भारतात येणार आहे. यावेळी ते दिल्ली इंडियन इन्स्टिट्‌यूट ऑफ टेक्नॉलॉजीला भेट देणार आहेत. शिवाय तेथील विद्यार्थ्यांशी संवादही साधणार आहेत. झुकेरबर्ग यांनी आज शुक्रवारी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली.
झुकेरबर्ग यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, ‘‘ मी फेसबुकवर आलेले प्रश्‍न आणि दिल्ली इंडियन इन्स्टिट्‌यूट ऑफ टेक्नॉलीजीच्या प्रेक्षकांकडून आलेल्या प्रश्‍नांची लाइव्ह उत्तरे देणार आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झुकेरबर्ग यांचा हा भारतातील दुसरा दौरा आहे. गेल्यावर्षी ९ ते १० ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या इंटरनेट डॉट ओआरजी संमेलनात सहभागी झाले होते. सोशल नेटवर्किंगसाठी भारत हा जगात दुसर्‍या क्रमांकाची बाजारपेठ आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25165

Posted by on Oct 17 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1326 of 2453 articles)


=पंकजा मुंडे यांचा निर्णय= मुंबई, [१६ ऑक्टोबर] - पत्र किंवा निवेदने घेऊन येणार्‍या अभ्यागतांचे प्रश्‍न तातडीने मार्गी लागणे सुलभ व्हावे ...

×