Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » टि्‌वटर झाले १० वर्षाचे!

टि्‌वटर झाले १० वर्षाचे!

twitterमुंबई, [२१ मार्च] – जगातील प्रसिद्ध मेसेजिंग वेबसाईट टि्‌वटरचा आज दहावा वाढदिवस आहे. ‘टि्‌वटर’च्या दशकपूर्तीनिमित्त आज लाखो युझर्सनी शुभेच्छा दिल्या असून टि्‌वटरने एका व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानले आहेत. २१ मार्च २००६ साली टि्‌वटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने पहिले टि्‌वट केले होते.
टि्‌वटर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत टि्‌वटरमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज जगातील अनेक सेलिब्रेटी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी याचा वापर करतात. आज टि्‌वटरवर दिवसभरात ५० कोटी टि्‌वट केले जातात. तर दरवर्षी २० अब्ज टि्‌वट केले जातात. टि्‌वटरने दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यात ३० कोटी २० लाख यूजर्स ऍक्टिव्ह झाले आहेत.
अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात बिझ स्टोन, ईव्हान विलियन्स आणि जैक डॉर्सी या तिघांनी मिळून ही कंपनी सुरू केली. ‘जस्ट सेंटिग अप माय टि्‌वटर’ असे पहिले टि्‌वट जॅक डॉर्सीने केले आणि या टि्‌वटरचा उदय झाला.
मागील दहावर्षापासून टि्‌वटर दिवसेंदिवस प्रसिद्ध होत असले तरी त्याचे प्रतिस्पर्धीही वाढत आहेत. फेसबूक हे टि्‌वटरचं सर्वात मोठं प्रतिस्पर्धी आहे. असे असतानाही टि्‌वटर जाहिरातींच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे. २०१५ साली टि्‌वटरने २.२ अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखापासून ते शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांच्यासह प्रख्यात सेलिब्रेटीपर्यंत सर्वजण टि्‌वटरवरच आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27505

Posted by on Mar 22 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (600 of 2458 articles)


=जमानतदाराने हमी मागे घेतली= नवी दिल्ली, [२१ मार्च] - हरयाणातील शिक्षक भरती घोटाळ्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले आणि ...

×