Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ट्युनिशियात दहशतवादी हल्ला, १२ ठार

ट्युनिशियात दहशतवादी हल्ला, १२ ठार

=आणिबाणी जाहीर=
tunisia-MAPट्युनिस, [२५ नोव्हेंबर] – पॅरिस हल्ल्याचे पडसाद कायम असतानाच, ट्युनिशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या रक्षणासाठी असलेल्या ताफ्यातील एका बसवर अतिरेक्यांनी बॉम्बहल्ला केला. यात १२ नागरिक ठार झाले असून, या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष बेजी केड ईस्सेब्सी यांनी देशात आणिबाणी जाहीर केली आहे. तर, राजधानी ट्युनिसमध्ये बेमुदत संचारबंदी घोषित करण्यात आली.
२०११ पासून जिहादी हल्ले सुरू असलेल्या ट्युनिसमध्ये राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षा रक्षकांच्या बसवर अतिरेक्यांनी मंगळवारी रात्री बॉम्बहल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच राष्ट्राध्यक्ष ईस्सेब्सी यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली, अशी माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली.
ट्युनिशियाचे राष्ट्राध्यक्ष आज बुधवारी स्वित्झर्लंडच्या दौर्‍यावर जाणार होते. पण, या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही अतिरेकी गटाने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यात २० जण जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा हल्ला अतिशय भीषण आहे. आम्ही दहशतवादविरोधी लढ्यात सहभागी असल्यानेच आम्हाला अतिरेक्यांनी लक्ष्य बनविले. सुरक्षेच्या कारणामुळे आगामी ३० दिवस देशात आणिबाणी कायम राहणार आहे, असे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले. याचवर्षीच्या जून महिन्यात येथील एका हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात ३८ जणांचा मृत्यू झाला होता, तर मार्चमध्ये बार्डो म्युझियममध्ये झालेल्या हल्ल्यात २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25731

Posted by on Nov 26 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1158 of 2458 articles)


=संयुक्त राष्ट्राच्या हवामान संस्थेची नोंद= जिनिव्हा, [२५ नोव्हेंबर] - २०१५ हे वर्ष तापमानाच्या दृष्टीने सर्वात उष्ण वर्ष असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ...

×