Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » डान्सबार बंदीचा कायदा करा

डान्सबार बंदीचा कायदा करा

=सहकार्य करण्याचे विरोधकांचे आश्‍वासन=
Radhakrushna Vikhe Patilमुंबई, [८ मार्च] – सरकारने राज्यात डान्सबारबाबत पुन्हा नव्याने कायदा सभागृहात आणावा. आम्ही दोन्ही सभागृहात सहकार्य करू, असे आश्‍वासन कॉंग्रेस-राष्ट्रवादीने फडणवीस सरकारला दिले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मंगळवारी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
कॉंग्रेसकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, तर राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भूमिका मांडली. दोन्हीही नेत्यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्रही सोडले.
डान्सबारबाबत शंका
सामान्य माणसाच्या मनातील डान्स बार बंदीबाबतचा संभ्रम दूर करायचा असेल तर १५ तारखेच्या आत नवा कायदा आणा, आम्ही त्याला पांठिबा देऊ, असे आश्‍वासन धनंजय मुंडेंनी यावेळी दिले. पण या नव्या सरकारचे बार मालकांसोबत काहीतरी आलबेल असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे. कोर्टाचा आधार घेत ही बंदी उठवली जात असल्याची शंका आहे. सरकारने नवा कायदा आणून ही शंका दूर करावी, असेही आवाहन मुंडे यांनी केले.
शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली
गेल्या चार वर्षांपासून मराठवाडा, खान्देश, विदर्भात दुष्काळी परिस्थिती आहे. गेल्या एका वर्षातील अधिवेशनांमध्ये आम्ही प्रत्येक वेळी कर्जमाफी, शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या. पण सरकारने तुटपुंजी मदत देऊन शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोपही धनंजय मुंडे यांनी यावेळी केला.
यंदा १९७२ पेक्षाही तीव्र दुष्काळ असताना दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेली आहे. सावकारी कर्जमाफी, रब्बी-खरीपाची मदत, पिकविम्याची थकित रक्कम, केंद्राकडून भरघोस मदत आणण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावाही मुंडे यांनी केला.
तिजोरीवर भार येईल म्हणून सरकार प्रशासनाला हाताशी धरून दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मुंडे म्हणाले.
पीकविम्याचे पैसे शेतकरी भरत असतो. अनुदान आणि पिकविमा वेगळा आहे. मात्र सरकार पीकविम्याचे हक्काचे पैसेही देत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
सरकारने गेल्या चार महिन्यांपासून एकाही चारा छावणीला पैसे दिलेले नाहीत. आता ६० कोटी दिले, मात्र ते खूपच अपुरे असल्याचे धनंजय मुंडेंनी नमूद केले.
पोलिसांची काळजी वाटते
राज्यातील कायदा सुव्यवस्थेची चर्चा करताना सामान्य माणसाची काळजी वाटत होती. पण आता गणवेशात असलेल्या पोलिसांची धिंड काढली जाणे, त्यांना मारहाण होणे, यावरूनच राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे समजत असल्याने पोलिसांचीही काळजी वाटायला लागली असल्याचे ते पुढे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27139

Posted by on Mar 9 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (726 of 2451 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - देशातील गरीब लोकांना स्वस्त औषधी योग्य दरात देण्याचा सरकारचा निर्धार आहे. सरकारने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा ...

×