Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डाळीचा ५८०० टन साठा जप्त

डाळीचा ५८०० टन साठा जप्त

  • केंद्राची धडक मोहीम
  • साठेबाजांचे धाबे दणाणले
  • पाच राज्यांमध्ये व्यापक धाडी

FOOD GRAIN price hikeनवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] – ऐन सणासुदीच्या दिवसात तूर डाळ २०० रुपयांच्या घरात पोहोचल्याने नफा कमविण्यासाठी डाळीचा काळाबाजार करणार्‍या साठेबाजांविरुद्ध केंद्र सरकारने धडक मोहीम उघडली. महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये व्यापक धाडसत्र राबवून ५८०० टन डाळीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे साठेबाजांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
देशभरातील बाजारपेठांमध्ये तूर डाळ प्रति किलो २०० रुपये दराने विकली जात आहे. तिला पर्याय असलेल्या उडद डाळीकरिता १६० रुपये मोजावे लागत आहे. देशभरातच डाळीमुळे आक्रोश सुरू असताना, केंद्राच्या निर्देशानुसार महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात जोरदार धाडी घातल्या. पुरवठा सुरळीत करून किमती कमी करण्यासाठीच ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ग्राहक व्यवहार सचिव सी. विश्‍वनाथ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
कॅबिनेट सचिवांनी आज मंगळवारी ग्राहक व्यवहार, कृषी, वाणिज्य आणि अन्य संबंधित मंत्रालयांच्या सचिवांची बैठक बोलावून डाळींची किंमत, उत्पादन, खरेदी आणि उपलब्धता याविषयीचा आढावा घेतला. केंद्राच्या निर्देशानुसार डाळींची साठेबाजी रोखण्यासाठी राज्य सरकारांनी कोणती कारवाई केली, याचाही आढावा घेण्यासोबतच, देशात आयातीत डाळींची सवलतीच्या दरात विक्री करण्याच्या प्रक्रियेची माहितीही प्राप्त करण्यात आली, असे विश्‍वनाथ यांनी सांगितले.
जीवनावश्यक वस्तू कायदा अधिक प्रभावी बनविण्याचे निर्देश आम्ही राज्यांना दिले आहेत. याच अनुषंगाने काही राज्यांनी अचानक धाडसत्र राबवून मोठ्या प्रमाणात डाळींचा साठा जप्त केला. यात तेलंगणातून सर्वाधिक २५४९ टन इतका साठा ताब्यात घेण्यात आला आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेशातून २२९५ टन, आंध्रप्रदेशातून ६०० टन, कर्नाटकातून ३६० टन आणि महाराष्ट्रातून १० क्लिटंल इतका डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आज मंगळवारीदेखील कर्नाटकातील म्हैसूर आणि गुलबर्गा तसेच तामिळनाडूतील काही शहरांमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत. साठेबाजांविरुद्ध राज्यांकडून सुरू असलेल्या कारवाईवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25225

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1311 of 2453 articles)


मुंबई, [२० ऑक्टोबर] - डाळ माफियांविरूद्ध सरकारने सुरू केलेल्या जोरदार कारवाईत आज मंगळवारी एकाच दिवसात २७० ठिकाणी धाडी घातल्या गेल्या, ...

×