Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ कलामांनी घेतला मुशर्रफांचा ‘क्लास’

डॉ कलामांनी घेतला मुशर्रफांचा ‘क्लास’

Abdul-Kalam-with-Musharrafनवी दिल्ली, [२८ जुलै] – २००५ मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम देशाचे राष्ट्रपती असताना, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ डॉ. कलाम यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले होते. भेटीच्या एक दिवस आधी डॉ. कलाम यांचे सचिव पी. के. नायर या भेटीबाबत राष्ट्रपतींना संक्षिप्त माहिती देण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले होते.
‘सर, उद्या जनरल परवेज मुशर्रफ आपली भेट घेण्याकरिता येणार आहेत,’ असे नायर यांनी सांगितल्यानंतर, ‘होय, मला माहीत आहे,’ असे उत्तर कलाम यांनी दिले. यावर नायर म्हणाले, मुशर्रफ नक्कीच काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतील. तुम्हाला यासाठी तयार राहायला हवे. तेव्हा, कलाम एक क्षणभर थांबले, नायर यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, ‘तुम्ही काळजी करू नका. मी व्यवस्थित सांभाळून घेईन.’
दुसर्‍या दिवशी साडेसात वाजता परवेज मुशर्रफ आपल्या ताफ्यासह राष्ट्रपती भवनात पोहोचले. त्यांना पहिल्या मजल्यावरील सभागृहात नेण्यात आले. डॉ. कलाम यांनी मुशर्रफ यांचे स्वागत केले. त्यांच्या खुर्चीपर्यंत गेले आणि त्यांच्या शेजारीच बसले. भेटीचा वेळ तीस मिनिटे निश्‍चित करण्यात आला होता.
डॉ. कलाम यांनी बोलण्यास सुरुवात केली. राष्ट्रपती महोदय, भारतासारखेच तुमच्याकडेही अनेक ग्रामीण भाग असतील. त्यांच्या विकासासाठी आपल्याला शक्य तेवढे करायला हवे, असे तुम्हाला वाटत नाही काय? त्यावर मुशर्रफ केवळ ‘हो’ असेच म्हणाले. त्यांना दुसरे काही सुचलेच नाही. डॉ. कलाम पुढे म्हणाले, ‘पुरा’ या शब्दाबाबत मी तुम्हाला संक्षिप्तपणे सांगतो. ‘पुरा’ या शब्दाचा अर्थ ‘प्रोव्हायडिंग अर्बन फॅसिलिटीज टू रुरल एरियाज,’ असा आहे. त्यानंतरच्या २६ मिनिटात डॉ. कलाम यांनी मुशर्रफ यांचा ‘पुरा’वर आणि आगामी २० वर्षांत दोन्ही देश या क्षेत्रात कशाप्रकारे काम करू शकतात, यावर मुशर्रफांचा क्लास घेतला. डॉ. कलाम यांनी आपल्या अतिशय चतुर आणि कुशाग्र बुद्धीचा वापर करून मुशर्रफांना काश्मीरच काय, तर अन्य कोणताही मुद्दा उपस्थित करण्याची संधीच दिली नाही. भेटीचा ३० मिनिटांचा वेळ संपल्यानंतर मुशर्रफ उठले आणि ‘धन्यवाद राष्ट्रपती महोदय, भारत अतिशय भाग्यवान आहे. या देशाकडे तुमच्यासारखा वैज्ञानिक राष्ट्रपतिपदावर विराजमान आहे,’ असे म्हणाले. त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. या भेटीची आठवण म्हणून नायर यांनी आपल्या डायरीत लिहिले की, डॉ. कलाम यांनी आज दाखवून दिले, वैज्ञानिकही चतुर असू शकतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23557

Posted by on Jul 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1536 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ जुलै] - देशाला अण्वस्त्रसज्ज करण्यात मोलाचे योगदान देणारे आणि ‘मिसाईल मॅन’ अशी ओळख असलेले देशाचे दिवंगत राष्ट्रपती ...

×