Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ कलामांनी देशाला गौरवाच्या शिखरावर पोहोचविले

डॉ कलामांनी देशाला गौरवाच्या शिखरावर पोहोचविले

=सरसंघचालकांची श्रद्धांजली=
dr.Mohan-bhagwatनागपूर, [२८ जुलै] – नामवंत वैज्ञानिक, अनेकांना प्रेरणा देणारे व दूरदृष्टी असलेले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने भारताने आपल्या सर्वात महान सुपुत्राला गमावले आहे, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज मंगळवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले की, एक शास्त्रज्ञ म्हणून देशाची संरक्षण यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे उभारण्यात मोलाचे योगदान दिले होते.
भारताचे राष्ट्रपती या नात्याने आपल्या उदात्त आचरणाने त्यांनी राष्ट्रपती कार्यालयाला प्रतिष्ठा मिळवून दिली होती, तसेच भारतालाही गौरवास्पद स्थान मिळवून दिले होते. मंदिरांची नगरी रामेश्‍वरम येथे राहणार्‍या एका छोट्या मुलापासून भारताचे राष्ट्रपती हा डॉ. अब्दुल कलाम यांचा जीवनपट म्हणजे अभूतपूर्व साहस, दृढसंकल्प आणि उत्कट व भव्यतेची प्राप्ती याचीच यशगाथा राहिली आहे. त्यांच्या जीवनचरित्राने आणि त्याबरोबरच आमच्या अग्नी, पृथ्वी, आकाश, त्रिशूल आणि नाग या क्षेपणास्त्रांमुळे आमच्या देशाची क्षेपणास्त्रे आंतराष्ट्रीय स्तरावरील क्षेपणास्त्रांच्या पंक्तीत जाऊन बसली आहेत. डॉ. कलाम यांना भारताची समृद्ध परंपरा आणि संस्कृतीविषयी आस्था होती. येथील प्रतिभावंत युवकांवर त्यांचा अतूट विश्‍वास होता. डॉ. कलाम भारताला ज्ञानवान आणि सशक्त राष्ट्र म्हणून घडवू इच्छित होते. त्यांच्या मृत्यूमुळे आपल्या देशाची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती अतीव दु:ख व्यक्त करतो, अशा शब्दात सरसंघचालकांनी डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23551

Posted by on Jul 29 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1538 of 2453 articles)


नागपूरः भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हळहळत आहे. ते भारताचे अमूल्य रत्न होते. माणसाने योग्य कर्म ...

×