Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ कलाम योजनेत ६९६२ गावांचा समावेश : सवरा

डॉ कलाम योजनेत ६९६२ गावांचा समावेश : सवरा

APJ-KALAMमुंबई, [२८ मार्च] – शासनाने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना १६ आदिवासी जिल्ह्यांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना ६,९६२ गावांसाठी असून अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्राचा यात समावेश करण्यात येतो. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ६७.९२ कोटी रुपये तरतूद करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी १ डिसेंबर २०१५ पासून करण्यात आली आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील आदिवासी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत विधानसभा सदस्य डॉ. संतोष टारफे यांनी प्रश्‍न विचारला होता. सवरा पुढे म्हणाले, या योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाची व कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याशिवाय स्तनदा मातांना चौरस आहार देणे यासाठीही भर देण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत योजना का राबविली जात नाही, याबाबत चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27622

Posted by on Mar 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (556 of 2453 articles)


=अमेरिकेची कडक भूमिका, लाहोर आत्मघाती हल्ला प्रकरण, बळीसंख्या ७२= वॉशिंग्टन, [२८ मार्च] - पाकिस्तानातील लाहोरमध्ये रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्याची अमेरिकेने ...

×