Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » डॉ नागेश ठाकूर अभाविपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

डॉ नागेश ठाकूर अभाविपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

=विनय बिद्रे राष्ट्रीय महामंत्री=
nagesh-thakurमुंबई, [१९ नोव्हेंबर] – युवकांमध्ये राष्ट्रभक्ती व चारित्र्याची जोपासना करणार्‍या आणि देशातील अग्रणी विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी २०१५-१६ या वर्षासाठी सिमल्याचे डॉ. नागेश ठाकूर यांची निवड झाली असून, बंगळुरूचे विनय बिद्रे यांची राष्ट्रीय महामंत्रिपदी बिनविरोध निवड झाली आहे. या दोघांच्याही नियुक्तीची घोषणा आज गुरुवारी अभाविपच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयातर्फे करण्यात आली.
अभाविप केंद्रीय कार्यालयातर्फे गुरुवारी निवडणूक अधिकारी डॉ. छगनभाई पटेल यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार वरील दोघांचाही कार्यकाळ एक वर्षाचा राहील. दोन्ही पदाधिकारी भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे २६ नोव्हेंबर रोजी होणार्‍या ६१ व्या राष्ट्रीय संमेलनात आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.
डॉ. नागेश ठाकूर मूळचे हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगरचे रहिवासी आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच त्यांनी विद्यार्थी आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली आहे. भौतिकशास्त्रात पीएचडी प्राप्त केल्यानंतर डॉ. ठाकूर सिमला येथील हिमाचल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. भौतिकशास्त्राशी संबंधित त्यांचे ८५ आंतरराष्ट्रीय जर्नल प्रकाशित झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून तिबेट समस्या, काश्मीर व पंजाबमधील दहशतवाद, युवकांमधील नैतिक मूल्ये या विषयांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. डोंगरी हिमाचल भागातील डाव्यांचे आंदोलन निष्प्रभ करून डॉ. ठाकूर यांनी तिथे अभाविपची मुळे घट्ट रोवली आणि आज हिमाचल प्रदेशात अभाविप ही सर्वांत शक्तिशाली संघटना म्हणून नावारूपास आली आहे. डॉ. नागेश ठाकूर यांनी २००४ ते २००७ पर्यंत अभाविपचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
विनय बिद्रे मूळचे कर्नाटक राज्यातील तुमकुर जिल्ह्यातील बिद्रे गावचे रहिवासी आहेत. १९९८ पासून ते अभाविपमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका, तसेच पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. यापूर्वी त्यांनी तुमकुर महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, तसेच कर्नाटक प्रांताचे प्रांतमंत्री व नंतर राष्ट्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. विविध सामाजिक व शैक्षणिक आंदोलनांचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. कर्नाटकातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. २०१४ मध्ये केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे चीनमध्ये गेलेल्या प्रतिनिधी मंडळात त्यांचाही समावेश होता. सध्या विनय बिद्रे यांच्यावर कर्नाटक आणि तेलंगणाचे सहक्षेत्रीय संघटनमंत्री म्हणून जबाबदारी आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25609

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1195 of 2453 articles)


=व्यापमं घोटाळा, सुप्रीम कोर्टाची राज्यपालांना, केंद्राला नोटीस= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] - प्रचंड गाजलेल्या मध्यप्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापमं) भरतीत ...

×