Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » डॉ सुब्रमण्यम स्वामींच्या विधानावरून राज्यसभेत गदारोळ

डॉ सुब्रमण्यम स्वामींच्या विधानावरून राज्यसभेत गदारोळ

dr subraniyam swamy in sajyasabhaनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – नवनियुक्त राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांंनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आज राज्यसभेत गोंधळ झाला. डॉ. स्वामींच्या विधानामुळे भडकलेले कॉंग्रेस सदस्य घोषणा देत वेलमध्ये आले.
आज राज्यसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच समाजवादी पार्टीचे मुनवर सलीम चौधरी यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील काही घटनांचा उल्लेख करताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे नाव घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याचा संदर्भ देत सोनिया गांधी यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळे कॉंग्रेस सदस्य संतप्त झाले आणि आधी जागेवर उभे राहून घोषणा देऊ लागले. त्यानंतर ते वेलमध्ये आले. उपसभापती पी. जे. कुरियन सदस्यांना जागेवर जाण्याचे आवाहन करू लागले. कॉंग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे सभागृहात काय सुरू आहे, ते ऐकू येत नव्हते. तुम्ही आधी जागेवर जा, असे कुरियन म्हणत होते. डॉ. स्वामींनी माफी मागावी, अशी कॉंग्रेसच्या सदस्यांची मागणी होती. सभागृहातील वातावरण तापल्यामुळे कुरियन यांनी डॉ. स्वामी यांचे विधान कामकाजातून वगळण्याची घोषणा केली, पण त्यामुळे कॉंग्रेस सदस्यांचे समाधान झाले नाही.
विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी डॉ. स्वामी म्हणजे भाजपाला मिळालेली नवी भेट असल्याचा उपरोधिक उल्लेख केला. डॉ. स्वामींना सभागृहात येऊन दोन दिवस झाले, पण त्यांची दोन विधाने कामकाजातून वगळावी लागली, ३६५ दिवसात त्यांची किती विधाने कामकाजातून वगळावी लागतील, अशी विचारणा आझाद यांनी केली. रस्त्यावर बोलायची भाषा आणि संसदेतील भाषा यातील फरक डॉ. स्वामींना समजत नाही, असेही ते म्हणाले.
यानंतरही डॉ. स्वामी उभे राहून बोलत होते. डॉ. स्वामी यांनी एका देशाच्या घटनेचा उल्लेख केला. डॉ. स्वामी विनाकारण कॉंग्रेस सदस्यांना भडकवत आहे, असे कुरियन म्हणाले. त्यामुळे सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी डॉ. स्वामींच्या आसनाजवळ जात त्यांना पाठ थोपटत समजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉ. स्वामी थोडे शांत झाले.
शून्य तासात आज डॉ. स्वामी यांचा एक विषय होता. पण उपसभापती कुरियन यांनी त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. यावर सांसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी हरकत घेतली. शून्य तासाच्या कामकाज पत्रिकेत डॉ. स्वामी यांचे नाव आहे, पीठासीन सभापती आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. त्यावर ही यादी अंतिम नाही, तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर अध्यक्षांकडे जा, असे उपसभापती कुरियन म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28062

Posted by on Apr 29 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (413 of 2453 articles)


लंडन, [२८ एप्रिल] - आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे आणखी एक उपलब्धी जोडली गेली आहे. आज गुरुवारी येथील ...

×