Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणे पडेल महागात

ड्रायव्हिंग करताना मोबाईलवर बोलणे पडेल महागात

diwakar rawate2मुंबई, [२ जानेवारी] – राज्य सरकारने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ वाल्यांना चांगला दणका देण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर आता गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास तीन महिने ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. नव्या वर्षात राज्यातील वाहतुकीचे नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
नव्या नियमांबाबतची माहिती देतांना रावतें यांनी सांगितले की, मद्यपी आणि मोबाइलवर बोलणार्‍या वाहनचालकांविरोधात कारवाई करण्यात येणार असून आता संपूर्ण राज्यात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार आहे. तशी घोषणाही रावते यांनी केली आहे. तसेच सीटबेल्टबाबातचे नियमही राज्यात लागू राहतील. हेल्मेट आणि सीटबेल्टचे नियम न पाळणार्‍यांना आता आरटीओ कार्यालयात समुपदेशनासाठी किमान दोन तास उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यास नकार दिला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणात येणार, असे रावते म्हणाले.
दरम्यान, दारू पिऊन गाडी चालवल्यास, अधिक वेगाने वाहन चालविल्यास, सिग्नल तोडल्यास, मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केल्यास किंवा मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक केल्यास वाहन परवाना रद्द होऊ शकतो.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26360

Posted by on Jan 2 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (955 of 2451 articles)


नवी दिल्ली, [१ जानेवारी] - बेशिस्तीच्या आरोपाखाली भाजपाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी आज ...

×