Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तणाव, संघर्षाने बदल होणे अशक्य : पंतप्रधान

तणाव, संघर्षाने बदल होणे अशक्य : पंतप्रधान

  • देशाला फायदा होईल असे बदल करा
  • आयएएस अधिकार्‍यांना आवाहन

narendra-modi4नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] – तणाव आणि संघर्षामुळे कोणताही बदल घडविणे शक्य होणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) अधिकार्‍यांनी देशाला फायदा होईल, असे सकारात्मक बदल घडवून आणावे, असे आवाहन केले.
‘तणाव आणि संघर्षामुळे कोणताही बदल शक्य नाही. याउलट आम्ही किती लोकांना एकत्र आणू शकतो, यावरच सर्वकाही अवलंबून आहे,’ असे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे २०१३ च्या तुकडीच्या १६९ अधिकार्‍यांशी संवाद साधताना सांगितले.
यानंतर तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागातील जिल्ह्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी जाणार आहात, त्यामुळे त्याठिकाणी गेल्यावर तुम्ही काही सकारात्मक बदल घडवून आणला तर देशालाही त्याचा फायदा होईल. पुढची दहा वर्षे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. या कालावधीत आपला पाया कसा मजबूत होईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना यावेळी केले.
जसा आमचा दृष्टिकोन असेल, त्याचप्रमाणे आपली कृती असली पाहिजे. प्रत्यक्षात काम करताना आम्ही जे शिकतो ते अत्यंत महत्त्वाचे असते. या पार्श्‍वभूमीवर अधिकार्‍यांनी प्रशासन अधिक सुलभ करण्यासाठी लोकांमध्ये जाऊन संवाद वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, या शब्दात पंतप्रधानांनी अधिकार्‍यांना प्रोत्साहन दिले.
या आयएएस अधिकार्‍यांनी ते ज्या राज्याच्या तुकडीचे अधिकारी आहेत तिथे काम करण्याऐवजी राष्ट्रीय राजधानीत सहाय्यक सचिव म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. यावेळी त्यांना संबंधित मंत्रालये आणि विभागातील महत्त्वाकांक्षी योजना आणि धोरणांशी संबंधित कार्यालयीन कामकाज देण्यात आले होते. सचिव स्तरावरील अधिकार्‍यांनी त्यांना मार्गदर्शन करताना त्यांची पायाभूत सुविधा, सामाजिक क्षेत्र, नियामन किंवा सहकारी क्षेत्र, अशा चार विभागांमध्ये विभागणी केली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25575

Posted by on Nov 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1205 of 2453 articles)


=सोनिया, राहुलने भूमिका स्पष्ट करावी : शाहनवाज हुसेन यांची मागणी= नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] - कॉंग्रेस देशात सांप्रदायिक ध्रुवीकरणाचे वातावरण ...

×