Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » तरीही महिला ‘स्त्रीधन’ परत मागू शकते

तरीही महिला ‘स्त्रीधन’ परत मागू शकते

=सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा=
supreme_court_1नवी दिल्ली, [२२ नोव्हेंबर] – ‘स्त्रीधन’ परत मागण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार घटस्फोट होणे आवश्यक नसते. घटस्फोट झालेला नसतानाही महिला पती व सासरच्या लोकांकडून ‘स्त्रीधन’ परत मागू शकते, असा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच एका प्रकरणात दिला.
न्यायालयीन आदेशानुसार वेगळे राहणे आणि घटस्फोट घेणे, या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत. स्त्रीधन म्हणजे चल किंवा अचल संपत्ती असू शकते. हे धन त्या महिलेला बालवयात, विवाहाच्या आधी किंवा विवाह सोहळ्यात मिळू शकते. ते महिलेची आयुष्यभराची संपत्ती असते. त्यामुळे स्त्रीधन परत मागण्यासाठी घटस्फोट व्हायलाच हवा, असे बंधन नाही. हे धन ज्यांच्या कस्टडीत आहे, तो पती असो किंवा सासरची कोणतीही व्यक्ती असो, त्यांच्यापासून ती केव्हाही प्राप्त करू शकते, असे न्या. दीपक मिश्रा आणि न्या. प्रफुल्ल सी. पंत यांच्या दोन सदस्यीय न्यायासनाने आपल्या निकालात स्पष्ट केले.
पती किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी स्त्रीधन कायमच आपल्या कस्टडीत ठेवणे हा गुन्हा आहे की नाही, यावरही विचार करण्याची गरज आहे. स्त्रीधन परत मिळविण्यासाठी कोणतीही पत्नी न्यायालयात धाव घेऊ शकते, यात काहीच वाद नाही. त्याचवेळी तिचा विश्‍वासघात होत असल्यास ती पती व सासरच्या अन्य सदस्यांविरोधात फौजदारी खटलाही दाखल करू शकते. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे रक्षण करणार्‍या कायद्यातील कलम १२ अंतर्गत स्त्रीधनावर हक्क सांगण्याचा अधिकार तिला प्राप्त आहे, असेही निकालात म्हटले आहे.
पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला स्त्रीधन परत मागण्याचा अधिकार नाही आणि ती महिला या प्रकरणी फौजदारी खटलाही दाखल करू शकत नाही, असा निकाल त्रिपुरातील एका कनिष्ठ न्यायालयाने दिल्यानंतर उच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे रक्षण करणार्‍या कायद्यात महिलांना पूर्णपणे सुरक्षा देण्यात आली असून, महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणात न्यायालयांनी संवेदनशील होण्याची गरज असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25656

Posted by on Nov 23 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1179 of 2453 articles)


=‘वॉटर एड’चा अहवाल, लोकांचा दृष्टिकोन बदलविण्यासाठी जादा निधीची गरज= कोची, [२२ नोव्हेंबर] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत ...

×