Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » तर अमेरिकेवर सायबर हल्ला करू

तर अमेरिकेवर सायबर हल्ला करू

=उत्तर कोरियाची धमकी=
northkoreaप्योंगयोंग, [५ फेब्रुवारी] – गँगस्टरसारख्या अमेरिकन प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी आता कोणताही वाव उरला नसल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले असून, अमेरिकेकडून होणार्‍या कोणत्याही अणु किंवा सायबर हल्ल्याला संपूर्ण क्षमतेने सडेतोड प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध अतिशय खराब झाले असतानाच उत्तर कोरियाने अधिकृत निवेदन जारी करून अमेरिकेसोबतची चर्चा पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरिया हा जगातील वाळीत टाकण्यात आलेला असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटल्यानंतर उत्तर कोरियाने हा इशारा दिला आहे. गँगस्टरसारख्या अमेरिकन प्रशासनासोबत कोणतीही चर्चा शक्य नाही, असे नॅशनल डिफेन्स कमीशन या उत्तर कोरियाच्या सर्वोच्च लष्करी युनिटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अमेरिकन भांडवलदार यावेळी आपला अंत बघतील, असा इशारा केसीएनए या उत्तर कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने जारी केलेल्या अहवालात दिला आहे. ओबामा प्रशासनाने सोनी स्टुडिओवर झालेल्या सायबर हल्ल्याकरिता प्योंगयोंगला जबाबदार ठरविले होते. उत्तर कोरियाने मात्र अशाप्रकारचा सायबर हल्ला केल्याच्या आरोपाचे स्पष्टपणे खंडन केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20334

Posted by on Feb 6 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2119 of 2458 articles)


नवी दिल्ली, [५ फेब्रुवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज गुरुवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी हजारो ...

×