Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तर त्यांचा गळाच कापला असता : रामदेवबाबा

तर त्यांचा गळाच कापला असता : रामदेवबाबा

baba_ramdevनवी दिल्ली, [४ एप्रिल] – ‘भारत माता की जय’ म्हणण्याच्या मुद्यावरून सध्या देशात सुरू असलेल्या गदारोळात आता योगगुरू रामदेवबाबा यांनीही उडी घेतली आहे. जर देशात कायदा नसता, तर भारत माता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकांचा गळाच आपण कापला असता, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रोहतकमध्ये सद्भावना सभेचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘कोणत्या धर्मामध्ये मातृभूमीचा आदर करा, असे शिकवत नसतील, तर तो धर्मच देशहिताचा नाही. कोणी एकजण टोपी घालून उठून उभा राहतो आणि म्हणतो भारतमाता की जय म्हणणार नाही. हवे असेल तर माझा गळा कापा. या देशात कायदा आहे म्हणून, नाहीतर तुझ्या एकट्याचाच का आम्ही तर लाखो लोकांचे गळे कापू शकलो असतो. पण आम्ही या देशातील कायद्याचा सन्मान करतो. नाहीतर कोणी भारतमातेचा अपमान केल्यावर एकाचे नाही तर अनेकांचे गळे कापण्यास आम्ही समर्थ आहोत. भारतमाता की जय म्हणणे आमच्या धर्माच्या विरोधी असल्याचे काही संस्था म्हणतात, त्यावेळी मला आश्‍चर्य वाटते, असे सांगून रामदेवबाबा म्हणाले, आपल्या मातृभूमीचा गौरव करणे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. तरीही जर कोणता धर्म असे म्हणत असेल तर तो धर्मच या देशाच्या हिताचा नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27708

Posted by on Apr 5 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (528 of 2453 articles)


श्रीनगर, [४ एप्रिल] - पीडीपी पक्षाच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी सकाळी जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ५६ ...

×