Home » कला भारती, ठळक बातम्या » तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

मुंबई, (११ फेब्रुवारी) – ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे’ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी आयोजित केलेल्या सिंध महोत्सवात त्या बोलत होत्या. मुळात आपला व्यवसायच अभिनय करण्याचा असल्याने चांगली पटकथा आणि विषय उत्तम असल्यास कुठेही काम करण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानला आल्याने नेहमीच आनंद होतो, कारण दोन्ही देशांमध्ये खूप साम्य आहे, असे प्रतिपादन आझमी यांनी केले आहे. दोन्ही देशातील नागरिक एकमेकांच्या संपर्कात आहेत, ही खूप चांगली बाब असल्याचेही शबाना आझमी यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10988

Posted by on Feb 12 2014. Filed under कला भारती, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कला भारती, ठळक बातम्या (2446 of 2457 articles)


= रामदेव बाबा = नागपूर, (१० फेब्रुवारी) - स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रगुरू असून, गुरुकुलमध्ये शिकत असल्यापासूनचे ते माझे आदर्श आहेत. ...

×