Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » तर बदलला असता भारताचा इतिहास

तर बदलला असता भारताचा इतिहास

=‘ए लाईफ इन डिप्लोमसी’च्या प्रकाशनप्रसंगी रसगोत्र यांचे प्रतिपादन=
3-maharaja-krishna-rasgotraनवी दिल्ली, [१४ जून] – एनएसजीत भारताच्या प्रवेशाला आज चीनकडून होत असलेला तीव्र विरोध पाहता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी यांचा अण्वस्त्र परीक्षणात मदत करण्याचा प्रस्ताव मान्य केला असता तर आज भारताचा इतिहास वेगळा राहिला असता. मात्र नेहरूंनी तो ठोकरून लावल्याची माहिती माजी परराष्ट्र सचिव महाराजकृष्ण रसगोत्र यांनी येथे दिली.
ऑसर्व्हर रीसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) तर्फे काढण्यात आलेल्या ‘ए लाईफ इन डिप्लोमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी येथे आयोजित कार्यक्रमात रसगोत्र बोलत होते.
ते पुढे म्हणतात की, जर पं. नेहरू यांनी तो प्रस्ताव मान्य केला असता तर आशियामध्ये भारताने चीनच्या पहिले अण्वस्त्र परीक्षण केले असते आणि १९६२ मध्ये झालेल्या युद्धापासूनही तो चीनला रोखू शकला असता. सोबतच पाकिस्तानचे फिल्ड मार्शल अयूब खान यांच्या १९६५ च्या युद्ध योजनंनाही इशारा देण्यात भारत यशस्वी ठरला असता.
भारतातील लोकशाहीचे प्रशंसक राहिलेले आणि पं. नेहरू यांचा सन्मान करणारे केनडी यांना वाटायचे की, अण्वस्त्र परीक्षण करणारा पहिला आशियाई देश म्हणून कम्युनिस्ट चीन नाही तर लोकशाहीवादी भारताचे नाव झाले पाहिजे, असे सांगत रसगोत्र पुढे म्हणाले की, केनडी यांनी लिखित स्वरूपात पाठवलेल्या या पत्रासोबत अमेरिकन अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांचे तांत्रिक टिपणही जोडलेले होते. त्यात अध्यक्षांनी त्यांची संस्था भारतीय अणुशास्त्रज्ञांना साह्य करेल, असे लिहिले होते. एवढेच नाही तर चीनने अण्वस्त्र परीक्षण केले तर ते नेहरूंचे सरकार व भारताच्या सुरक्षेसाठी राजकीय आणि संरक्षणासंबंधी धोका निर्माण करेल, असेही केनडी यांनी या पत्रातून लक्षात आणून दिले होते.
राष्ट्रीय सुरक्षेपेक्षा अन्य कोणतीही बाब महत्त्वाची नाही, यावरही केनडी यांनी या पत्रातून जोर दिला होता, असेही रसगोत्र यांनी याचेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28595

Posted by on Jun 15 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (238 of 2453 articles)


=आण्विक पुरवठादार गटात भारताच्या समावेशाला विरोध= बीजिंग, [१४ जून] - आण्विक पुरवठादार गटात भारताच्या संभाव्य समावेशाला पहिल्यांदाच चीनी सरकारी माध्यमांनीदेखील ...

×