Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » तर साहित्य संमेलन होऊ देणार नाही: आठवले

तर साहित्य संमेलन होऊ देणार नाही: आठवले

ramdas-athavaleपिंपरी – चिंचवड, [२ जानेवारी] – पिंपरी चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवर टीका करताना एकेरीत उल्लेख केला. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.
आकुर्डी येथील महाविद्यातील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तसेच त्यांचा एकेरी उल्लेखही केला होता. त्यामुळे साहित्यवर्तुळात तसेच सामान्यांमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर आठवले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहेत. ते प्रत्येक जाती – धर्माचा मान ठेवतात. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. आरपीआयचे कार्यकर्ते ते कधीही सहन करणार नाहीत. श्रीपाल सबनीस यांनी जर पुन्हा मोदींबद्दल अशाप्रकारे वक्तव्य केले, तर आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते हे साहित्य संमेलन उधळून लावतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
लातूर येथील सत्कार समितीचे समन्वयक प्रा. फ. म. शहाजिंदे यांनी सबनीस यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी आपले पद काय आहे हे लक्षात घेऊन शब्दांचा वापर करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26385

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (946 of 2451 articles)


=सोमवारी अंत्यसंस्कार= नवी दिल्ली, [२ जानेवारी] - आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी समर्पित करणारे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अध्वर्यू ...

×