Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » ताजमहालाचे तेज कमी करणार्‍या घटकाचा शोध

ताजमहालाचे तेज कमी करणार्‍या घटकाचा शोध

=अभ्यासकांचा दावा=
taj mahalलंडन, [८ जानेवारी] – जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहाल या सुंदर वास्तूच्या पांढर्‍या शुभ्र संगमरवराला पिवळेपणा आणून त्याचे तेज कमी करणार्‍या घटकांचा शोध लावण्यात आल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय चमूने केलेल्या अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
काळा आणि तपकिरी कार्बन ताजमहालाच्या शुभ्र सौंदर्याला बाधक ठरत असल्याचे निरिक्षण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. कचर्‍याची विल्हेवाट लावताना आणि गाड्यांच्या धुरातून हा वायू निर्माण होत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणामुळे होणारा हा परिणाम टाळण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे वर्षातून एकदा ताजचे ‘फेशियल’ केले जाते. त्यासाठी संपूर्ण वास्तूवर मुलतानी मातीचा लेप लावण्यात येतो. मात्र, या उपायाने ताजचा पिवळेपणा मुळीच कमी झाला नसून दरवर्षी वाढत्या प्रदूषणासोबतच त्यात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ताजला पिवळे करणार्‍या घटकांची नेमकी माहिती मिळाल्यास हा दुष्परिणाम टाळता येईल, असे संशोधकांचे मत आहे. अमेरिकन रसायन संस्थेचे अभ्यासक माईक बर्गिन आणि सच्चिदानंद त्रिपाठी यांनी ताजवरील प्रदूषणाचा परिणाम रोखण्यासाठी नजिकच्या परिसरातील वाहतूक निर्बंधित करण्यासह स्थानिक कारखान्यांमुळे होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतलेल्या प्रयत्नांची नोंद घेतली आहे. निर्बंध आणि वर्षातून एकदा ताजच्या घुमट आणि मनोर्‍यांची पूर्ण स्वच्छता होते मात्र, ताजला वाचविण्यासाठी हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
अभ्यासकांच्या चमूने गेले अनेक महिने ताजच्या आसमंतातील हवेचे कण आणि मुख्य घुमटाच्या संगमरवराचा अभ्यास केला. या अभ्यासासाठी संशोधकांनी प्रकाशाच्या परावर्तनाच्या एका विशेष पद्धतीचा वापर केला. ताजमहालाचा पिवळेपणा घालविण्यासाठी हवेचे शुद्धीकरण हाच एकमेव मार्ग असल्याचा निष्कर्ष या चमूने काढला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19503

Posted by on Jan 9 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (2278 of 2458 articles)


=नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निर्धार= मुंबई, [८ जानेवारी] - भारतीय जनता पार्टीचे काम राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार ...

×