Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ताजमहाल म्हणजे प्राचिन हिंदू मंदिरच

ताजमहाल म्हणजे प्राचिन हिंदू मंदिरच

=लक्ष्मीकांत वाजपेयी यांचा पुराव्यांसह दावा=
Laxmikant Bajpaiबहराईच, [८ डिसेंबर] – प्रेमाचे प्रतिक आणि जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेला उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील ताजमहाल ज्या जागेवर उभा आहे, तिथे पूर्वी तेजोमहालय मंदिर होते, असा दावा करून, आपले म्हणणे सिद्ध करणारे ठोस पुरावे उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी पत्रकारांपुढे सादर केले.
समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी अलीकडेच ताजमहालची मालकी वक्फ बोर्डाकडे देण्याची मागणी केली होती. याच अनुषंगाने वाजपेयी यांनी हा दावा केला आहे. तत्कालीन राजे जयसिंग यांच्याकडून मुघल सम्राट शहाजहॉं यांनी तेजोमहालय मंदिराचा काही परिसर खरेदी केला होता. याच मंदिराच्या जागेवर मुघल सम्राटाने आपली पत्नी मुमताजसाठी ताजमहाल बांधला, असे वाजपेयी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
आपला दावा सिद्ध करण्यासाठी वाजपेयी यांनी पुरातन कागदपत्रेही सादर केली. आझम खान यांनी वक्फ बोर्डाची जागा तर हडपली आणि आता जागतिक आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालवरही त्यांचा डोळा आहे. ताजमहालमध्ये पाचवेळा नमाज पडण्याचे त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही, अशा शब्दात त्यांनी आझम खान यांना ठणकावले.
ताजमहाल जागतिक वारसा असून, भारताची शान आहे. त्यामुळे शिया किंवा सुन्नी वक्फ बोर्डाकडे ही वास्तू देण्यात येऊ नये, अशी विनंती ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना यासूब अब्बास यांनी केली आहे. शिया व सुन्नी वक्फ बोर्ड हे मशिदी आणि मदरशांचीच काळजी घेऊ शकलेले नसल्यामुळे त्यांचाकडे ताजमहालची व्यवस्था कशी देणार, असे झाल्यास शिया व सुन्नीत संघर्ष होईल, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18855

Posted by on Dec 9 2014. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2326 of 2452 articles)


पॅरिस, [६ डिसेंबर] - फ्रान्समधील अभियंत्यांनी वीज तयार करणारे एक कृत्रिम झाड तयार करण्यात यश मिळवले आहे. हे झाड हवेचा ...

×