Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा जीएसटीला पाठिंबा

तामिळनाडू वगळता सर्व राज्यांचा जीएसटीला पाठिंबा

=अरुण जेटली यांची माहिती=
arun-jaitley2कोलकाता, [१४ जून] – वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकाला देशातील सर्वच राज्यांनी आपला पाठिंबा दिला आहे. केवळ तामिळनाडूचा विधेयकातील काही तरतुदींना विरोध आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी येथे दिली.
जीएसटीवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या सर्वाधिकार समितीच्या बैठकीनंतर जेटली बोलत होते.
जीएसटीची अंमलबजावणी केव्हा करायची, याबाबत सरकारने कुठलाही अवधी निर्धारित केलेला नाही, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
सरकारने यापूर्वी देशभरात समान करप्रणाली अस्तित्वा आणण्यासाठी यावर्षीच्या १ एप्रिलपासून जीएसटी अंमलात आणण्याचे धोरण स्वीकारले होते. पण, याबाबतचे घटनादुरुस्ती विधेयक कॉंगे्रसच्या प्रखर विरोधामुळे राज्यसभेत अडकून पडले आहे.
आज तामिळनाडू वगळता सर्वच राज्यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीला पाठिंबा दिला आहे. तामिळनाडू सरकारतर्फे आम्हाला काही सूचना प्राप्त झाल्या असून, त्याची समितीने नोंद केली आहे, असे जेटली यांनी या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवसानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सुमारे २२ राज्यांचे अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित होते. तर, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयतर्फे स्वत: मुख्यमंत्री उपस्थित होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया बैठकीत सहभागी झाले होते. सर्वच राज्यांनी जीएसटीवर आपले मत आणि महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत, असे जेटली यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28604

Posted by on Jun 15 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (235 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१४ जून] - लाभाच्या पदाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपाच्या नेत्या खा. ...

×