Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तिरंग्याचा सन्मान राखा

तिरंग्याचा सन्मान राखा

=केंद्राची राज्यांना सूचना=
indian-flag--tirangaनवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] – १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्लॅस्टिक तिरंग्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याने ते पायाखाली तुडविण्याचे प्रमाणही फार जास्त आहे. अशा प्लॅस्टिक तिरंग्याच्या वापराला आळा घालण्यासह राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची प्रत्येक राज्याची जबाबदारी आहे, अशी कडक सूचना केंद्र सरकारने आज शनिवारी केली.
गृहमंत्रालयाने याबाबतचे दिशानिर्देश आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केले आहेत. तिरंग्याचा अपमान करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. प्लॅस्टिकचे ध्वज नष्ट करता येण्यासारखे नसल्याने त्यांच्या वापरावर कायमचीच बंदी घातली जावी, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तिरंग्याचा अपमान केल्याचे सिद्ध झाल्यास दोषीला किमान तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद कायद्यात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29199

Posted by on Aug 14 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (123 of 2453 articles)


=पीडित आई, मुलीची सुप्रीम कोर्टात धाव= नवी दिल्ली, [१३ ऑगस्ट] - उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर भागातील राष्ट्रीय महामार्गावर सामूहिक बलात्काराची बळी ठरलेली ...

×