Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास

तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास

kashi vishwnathलखनौ, [९ फेब्रुवारी] – वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिराला दररोज लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत असतात. त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासह मंदिराच्या व्यवस्थेकरीता नियमित उत्पन्नाचे मार्ग शोधण्यासाठी काशी विश्‍वनाथ मंदिराचा तिरुपती आणि शिर्डी येथील प्रख्यात मंदिरांच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम् आणि शिर्डी साईबाबा ट्रस्ट ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर व्यवस्थापन असून त्यांना वर्षाकाठी देणग्या आणि इतर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची रोख आणि सोन्याचांदीचे दागिने मिळतात. विश्‍वनाथ मंदिरातील व्यवस्थापन सदस्यांची एक चमू या दोन्ही मंदिरांना भेट देऊन तेथील व्यवस्थापनाचा अभ्यास करणार आहे. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार काशीच्या मंदिरातही शक्य ते बदल करण्यात येऊन मंदिराला अधिक सुसज्ज आणि भक्तनिवासासारख्या अद्ययावत सोयींनी परिपूर्ण करण्यात येईल, अशी माहिती धार्मिक व्यवहारविषयक स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री विजय कुमार मिश्रा यांना वृत्तसंस्थेशी बोलतान दिली.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्‍वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या मंदिराला दरवर्षी ४-५ कोटी रुपये देणगीपोटी प्राप्त होतात. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या मंदिराच्या सुधारणेचा आराखडा उत्तर प्रदेश सरकारने तयार केला आहे. त्यानुसार, मंदिरातील सुधारणांसह त्याकडे जाणार्‍या रस्त्यांचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. दर्शनासाठी निश्‍चित व्यवस्था करण्यासह रांगेत असलेल्या भाविकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करण्याची योजना आहे. यासोबतच, मंदिराचे संकेतस्थळ सुरू करून त्यावर मंदिराचा इतिहास आणि येण्याच्या मार्गासह भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात दानपेट्या बसविण्यात येणार असून, त्या कॅमेर्‍यांच्या नजरेच्या टप्प्यात राहणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20457

Posted by on Feb 10 2015. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (2081 of 2452 articles)


=४८ तासात बहुमत सिद्ध करण्याची पक्षाची मागणी= नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] - पक्षादेश झुगारणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर विश्‍वासघात ...

×