Home » ठळक बातम्या, बिहार, राज्य » तिसर्‍या टप्प्याचा प्रचार संपला

तिसर्‍या टप्प्याचा प्रचार संपला

bihar election1पाटणा, [२६ ऑक्टोबर] – बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज सोमवारी शांत झाल्या. या टप्प्यातील मतदान बुधवार, २८ रोजी होणार आहे.
या टप्प्यात सारण, वैशाली, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या सहा जिल्ह्यांतील ५० जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या ५० पैकी १० विधानसभा क्षेत्रांना अतिसंवेदनशील घोषित केले असल्याने तेथे सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत मतदान होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजप्रताप व तेजस्वी यादव यांच्यासह विधानसभेतील विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव, मंत्री श्याम रंजक, अमरेंद्र प्रतापसिंह यांच्यासह ८०८ उमेदवार या टप्प्यात आपले भाग्य आजमावणार आहेत.
तिसर्‍या टप्प्यातील मतदानापूर्वी सोमवारी निवडणूक लढवणार्‍या सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रमुख नेत्यांच्या अनेक प्रचार सभांचे आयोजन केले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, मुख्यमंत्री नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25345

Posted by on Oct 27 2015. Filed under ठळक बातम्या, बिहार, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, बिहार, राज्य (1272 of 2452 articles)


लखनौ, [२६ ऑक्टोबर] - रा. स्व. संघाचे स्ययंसेवक असल्यासारखे राज्यपाल राम नाईक वागत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे महासचिव राम गोपाल ...

×