Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » तीन खाणींचा लिलाव

तीन खाणींचा लिलाव

=सरकारला मिळाले १२,५९१ कोटी=
coalनवी दिल्ली, [७ मार्च] – तिसर्‍या फेरीत केंद्र सरकारने आज शनिवारी आणखी तीन कोळसा खाणींचा लिलाव केला. हिंडाल्को, जिंदल पॉवर आणि इंद्रजित पॉवर या कंपन्यांनी या खाणी खरेदी केल्या असून, यातून सरकारच्या तिजोरीत १२,५९१ कोटी रुपये जमा झाले आहेत.
लिलावाच्या या फेरीत कंपन्यांमध्ये प्रचंड स्पर्धा होती. यात हिंडाल्को इंडस्ट्रीजने झारखंडमधील डुमरी खाण सर्वात जास्त बोली लावून मिळविली. तर, जिंदल पॉवरने छत्तीसगडमधील तारा कोळसा खाण आणि इंद्रजित पॉवरने महाराष्ट्रातील नेरड मालेगावची खाण प्राप्त केली. इंद्रजित पॉवरने नेरड खाणीकरिता सर्वाधिक प्रति टन ६६० रुपयांची बोली लावली. तर, हिंडाल्कोने डुमरी खाणीकरिता २१२७ रुपये प्रति टन अशी बोली लावली. जिंदल पॉवरने तारा खाणीकरिता १२६ रुपये प्रति टन, असा भाव दिल्याची माहिती कोळसा सचिव अनिल स्वरूप यांनी ट्विटरवर दिली.
या तिन्ही खाणींच्या लिलावातून सरकारला १२,५९१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत सरकारने एक लाख कोटी रुपये मिळविले होते. तर, संपूर्ण प्रक़्रियेतून सरकारच्या तिजोरीत १.४३ लाख कोटी रुपये जमा होणार आहेत. उद्या रविवारी आणखी तीन कोळसा खाणींचा लिलाव होणार आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21175

Posted by on Mar 8 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1959 of 2453 articles)


टाईम मॅगझिनचा अहवाल बराक ओबामांचाही समावेश न्यूयॉर्क, [७ मार्च] - टाईम मॅगझिनने नुकतीच इंटरनेटवर सर्वात प्रभावशाली अशा ३० व्यक्तीची ...

×