Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » तीन राज्यांना ८४२ कोटींचा दुष्काळ निधी

तीन राज्यांना ८४२ कोटींचा दुष्काळ निधी

=कर्नाटक, पुद्दूचेरी, अरुणाचलचा समावेश=
Rajnath_Singhनवी दिल्ली, [२२ एप्रिल] – दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सामना करीत असलेल्या कर्नाटक, पुद्दूचेरी आणि अरुणाचल प्रदेश या तीन राज्यांकरिता केंद्र सरकारने आज शुक्रवारी ८४२ कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. भीषण दुष्काळाचा सामना करीत असलेल्या कर्नाटकचा, तसेच अवकाळी पावसामुळे पूरस्थितीचा सामना करणार्‍या पुद्दूचेरी व अरुणाचलचा केंद्रीय पथकांनी अलीकडेच दौरा करून स्थितीची पाहणी केली होती. या पथकांच्या शिफारसीनुसार हा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती गृह मंत्रालयातील प्रवक्त्याने दिली.
यातील ७२३.२३ कोटी रुपये एकट्या कर्नाटकला मिळणार असून, ३५.१४ कोटी रुपये पुद्दूचेरीला आणि ८४.३३ कोटी रुपये अरुणाचल प्रदेशला मिळणार आहेत. अरुणाचलला मिळणार्‍या निधीतील १८ कोटी रुपये राष्ट्रीय ग्रामीण जल कार्यक्रमाकरिता मिळणार आहेत.
या बैठकीत अर्थ मंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधा मोहन सिंह, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहर्षी आणि गृह, अर्थ व कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील एकूण दहा राज्यांमध्येे केंद्र सरकारने दुष्काळ जाहीर केला होता. यात महाराष्ट्राचाही समावेश असून, या सर्व राज्यांना केंद्राने १० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27939

Posted by on Apr 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (454 of 2453 articles)


=सीमेवर सुरू आहे बंकर्सचे बांधकाम= जयपूर, [२२ एप्रिल] - भारतासोबत मैत्रीची भाषा बोलणार्‍या चीन आणि पाकिस्तानने आपला खरा चेहरा दाखविण्यास ...

×