Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » तुम्ही दहशतवाद व पाकला पाठीशी घातले

तुम्ही दहशतवाद व पाकला पाठीशी घातले

=भारताने चीनला ठणकावले=
vikas swaroopवॉशिंग्टन, [२ एप्रिल] – संयुक्त राष्ट्रसंघाच्या काळ्या यादीत पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार आणि जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरला टाकण्याचा मार्ग चीनने अडविल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणार्‍या पाकिस्तानला पाठीशी घालत आहात, अशा शब्दात भारताने चीनला ठणकावले आहे.
जगाच्या पाठीवरून दहशतवाद कायमचा नष्ट व्हावा, अशी भारताची प्रामाणिक इच्छा आहे. पण, संयुक्त राष्ट्र याबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येते. पठाणकोट हल्ल्यात जैश आणि या संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूदचा थेट सहभाग असतानाही मसूदला दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत टाकण्यात आले नाही. पाकसोबत मिळून चीनने मौलानाच नाही, तर दहशतवादी कारवायांचेही समर्थन केले आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मसूद अझहरला दहशतवादी जाहीर करण्याबाबत भारताने केलेल्या मागणीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या समितीने कुठलाही निर्णय न घेतल्याने आम्ही नाराज झालो आहोत. पठाणकोट हल्ल्यात त्याचा सहभाग होता आणि आम्ही हे सिद्ध करूनही त्याच्यावर बंदीची कारवाई झाली नाही. त्याच्या दहशतवादी संघटनेचे जाळे जगभरात असून, त्याच्यापासून मानवतेला धोका आहे, असे स्वरूप यांनी सांगितले.
मसूद अझहरवर बंदी घालण्याचा मुद्दा उपस्थित झाला असता, याबाबतचा निर्णय तातडीने घेतला जाऊ नये, अशी विनंती चीनने संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीकडे केली होती. चीनची ही भूमिका दहशतवाद आणि त्यांना आश्रय देणार्‍या पाकला पाठीशी घालणारी आहे, असे स्वरूप यांनी स्पष्ट केले.
चीनची भूमिका
संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्बंधांबाबत जे निकष आहेत, त्यात मौलाना मसूद बसत नाही. त्यामुळेच त्याला दहशतवादी म्हणून जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आम्ही आळा घातला, अशी भूमिका चीनचे येथील कायमस्वरूपी प्रतिनिधी लिऊ जैई यांनी विषद केली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27662

Posted by on Apr 3 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (545 of 2458 articles)


=विधानसभा निवडणूक= नवी दिल्ली, [२ एप्रिल] - पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याच्या पहिल्या भागातील मतदानाचा प्रचार आज शनिवारी थांबला ...

×