Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता?

=‘टॉक टू एके’ मध्ये केजरीवालांवर प्रश्‍नांची सरबत्ती=
Kejriwalनवी दिल्ली, [१७ जुलै] – बहुतेक सर्वच मुद्यांवरून केंद्र सरकार आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संघर्षाची भूमिका घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रविवारी ‘टॉक टू एके’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्रावर पुन्हा एकदा टीका केली. मोदी सरकारने केंद्र-दिल्ली संबंध भारत-पाकसारखेच तणावपूर्ण केले आहे, असे केजरीवाल म्हणाले.
विशेष म्हणजे, दिल्लीकरांनी केजरीवालांवर प्रश्‍नांची सरबत्ती झोडताना, ‘तुम्ही लोकांना इतके मूर्ख का बनवता,’ असा सवालही केला. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना केजरीवाल यांनी मात्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम सुरू केला आहे. त्याच्या पहिल्याच मालिकेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधण्यावर जास्त भर न देता, मोदी सरकारवर टीका करण्यास पसंती दिली.
केंद्र सरकारने दिल्लीत भारत-पाकसारखी स्थिती निर्माण केली नसती; तर आम्ही चारपट अधिक चांगले काम करू शकलो असतो, असा दावा त्यांनी केला. तब्बल अर्धा तास टीकांचा भडीमार केल्यानंतर केजरीवालांनी जनतेशी संवाद साधला. राज्य सरकारकडून जाहिरातींवर होणार्‍या भरमसाठ खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आम्ही जे काम केले आहे ते काल्पनिक नाही. आपण ते स्वत: पाहू शकता.
यावेळी एका श्रोत्याने निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या वायफायच्या आश्‍वासनाबाबत प्रश्‍न विचारला असता, माझे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यावर काम करीत होते, ते नसल्याने आम्हाला नव्या प्रधान सचिवांची नियुक्ती करावी लागणार आहे, असे उत्तर त्यांनी दिले. एका नागरिकाने तर, केजरीवाल तुम्ही जनतेला इतके मूर्ख का बनवता, असा थेट प्रश्‍न केला. तर, काहींनी कर्करोगावरील उपचार काय असावा, असे विचारले. रुपेश नामदेव असे नाव असलेल्या व्यक्तीने कटप्पाने बाहुबलीला का मारले, असा प्रश्‍न विचारला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29140

Posted by on Jul 18 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (140 of 2452 articles)


=विजेंदरच्या लढतीच्यावेळी घडला प्रकार= नवी दिल्ली, [१७ जुलै] - भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंह आणि ऑस्ट्रेलियाचा केरी होप यांच्यात शनिवारी रात्री ...

×