Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » तुरुंगात जाण्याची लाज नाही

तुरुंगात जाण्याची लाज नाही

=उमर खालिद पुन्हा बरळला=
umar khalidनवी दिल्ली, [१९ मार्च] – देशद्रोहाच्या खटल्यात आरोपी असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिदने शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा बडबड केली. दिल्लीतील न्यायालयाने काही अटींवर सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केल्यानंतर बाहेर आलेला उमर आणि अनिर्बान भट्टाचार्य जेएनयू कॅम्पसमध्ये गेले आणि तुरुंगात जाण्याची आम्हाला अजिबात लाज नाही. तसेच अटक झाल्यामुळेच आम्ही आणखी जवळ आलो, असे तो बरळला.
शुक्रवारी रात्री उशिरा उमर आणि अनिर्बानचे जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांनी आझादी, लाल सलाम यासारख्या घोषणांनी स्वागत केले. त्यामुळे जोशात आलेल्या उमरने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि रा. स्व. संघाविरोधात जहर ओकताना, आम्हाला तुरुंगात जाण्याचा गर्वच असून, मुळीच लाज वाटत नाही. आम्ही आवाज उठविल्याबद्दल आमच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. आता आम्ही अरुंधती रॉय आणि विनायक सेन यासारख्या लोकांसोबत जोडले गेलो आहोत. आम्ही गुन्हेगार नसून, सत्तेत बसलेलेच खरे गुन्हेगार आहेत. हे सत्ताधारी लोक आमची शिकार करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही त्याने भाषणात म्हटले.
मला आणि अनिर्बानला अटक झाल्यामुळेच आम्ही दोघे अतिशय जवळ आलो आहोत. आता आम्ही हा लढा आणखी प्रभावीपणे लढणार आहोत, अशी बडबडही त्याने केली.
उमर आणि अनिर्बान या दोघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या व्यक्तिगत हमीवर अंतरिम जामीन मिळाला आहे. दिल्ली पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. तो देखील अंतरिम जामिनावर कारागृहाबाहेर आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27463

Posted by on Mar 20 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (610 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१९ मार्च] - संसद हल्ल्यातील संशयित आरोप आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेला दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक एसएआर गिलानीलाही ...

×