Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » तृणमूल खासदारांचे प्रकरण नैतिकता समितीकडे

तृणमूल खासदारांचे प्रकरण नैतिकता समितीकडे

loksabhaनवी दिल्ली, [१६ मार्च] – तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांवर एका स्टिंग ऑपरेशनद्वारे पैसे घेण्याच्या लागलेल्या आरोपांचे प्रकरण आज लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील नैतिकता समितीकडे सोपवले.
भाजपा, कॉंग्रेस आणि माकपच्या सदस्यांनी मंगळवारी हे प्रकरण लोकसभेत उपस्थित करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यावर हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपवण्याची घोषणा सुमित्रा महाजन यांनी आज प्रश्‍नोत्तराचा तास संपताच केली. यावर तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य आणि स्टिंग ऑपरेशनमध्ये पैसे घेताना सापडलेले सौगत राय यांनी हरकत घेतली. हा निर्णय एकतर्फी असल्याचा आरोप करीत राय म्हणाले की, हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपवण्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी कोणाशीही चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे आता कोणीही कोणाचेही स्टिंग ऑपरेशन करेल आणि त्या अप्रमाणित स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीचे आदेश दिले जातील, हा प्रकार योग्य नाही.
मात्र, लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे, या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी करून त्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्‍वासही राय यांनी व्यक्त केला.
२००५ मध्ये झालेल्या अशाच एका स्टिंग ऑपरेशनचे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपवण्यात आले होते. समितीने आपल्या अहवालातून संबंधित खासदारांना दोषी धरत त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. आता या प्रकरणाची चौकशी लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार असून आपला अहवाल अध्यक्षांना सादर करणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27369

Posted by on Mar 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (641 of 2453 articles)


सिरसा, [१६ मार्च] - हरियाणातील सिरसामध्ये आधारकार्ड नोंदणी पथकाने एका १२ दिवसाच्या चिमुकल्याचे फोटोसहीत आधारकार्ड तयार केले आहे. विशेष म्हणजे ...

×