Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘ते’ सरकारी बाबू पंतप्रधान पुरस्काराचे मानकरी!

‘ते’ सरकारी बाबू पंतप्रधान पुरस्काराचे मानकरी!

narandra Modi-7नवी दिल्ली, [६ मार्च] – स्वच्छ भारत योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजना यासारख्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारमधील प्रशासकीय अधिकार्‍यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
येत्या २१ एप्रिल रोजी लोकसेवा दिवस साजरा केला जाणार आहे. याच दिवशी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत योगदान देणार्‍या सरकारी अधिकार्‍यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली.
केंद्र आणि राज्य स्तरावरील अधिकार्‍यांच्या अद्वितीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कमेच्या स्वरूपात हा पुरस्कार दिला जाणार आहे. सरकारी अधिकार्‍यांसोबत व्यक्ती आणि संस्थांनीही यात अमूल्य योगदान दिले असेल, तर त्यांचाही या पुरस्कारासाठी विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27054

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (756 of 2453 articles)


=मद्रास हायकोर्टाचा निर्वाळा= चेन्नई, [६ मार्च] - केवळ अनुदानित आणि शासकीय शाळांमध्येच नव्हे, तर विनाअनुदानित आणि खाजगी शाळांमध्येही सकाळची प्रार्थना ...

×