Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » …तोपर्यंत घरवापसी सुरूच राहणार

…तोपर्यंत घरवापसी सुरूच राहणार

=प्रवीण तोगडिया यांची स्पष्ट भूमिका=
PRAVEEN_TOGADIAमंगळुरू, [१७ जानेवारी] – देशात बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा केंद्र सरकार तयार करीत नाही तोपर्यंत विश्‍व हिंदू परिषदेचे ‘घर वापसी’ अभियान सुरूच राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांनी विशद केली.
येथून जवळच असलेल्या पुट्टूर येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजित ‘विराट हिंदू हृदय संगम’मध्ये बोलताना तोगडिया म्हणाले की, हिंदू धर्मातील लोकांवर बळजबरी करून आणि वेगवेगळी आमिषे दाखवून धर्मांतर करण्यात येत आहे. याचा परिणाम हिंदूंच्या लोकसंख्येवर होत असताना, धर्मांतरणाच्या मुद्यावर आता हिंदू शांत बसणार नाही. बळजबरीच्या धर्मांतरणावर आळा घालायलाच हवा.
अशा धर्मांतरणावर आळा घालणारा कायदा एकतर केंद्र सरकारने तातडीने तयार करावा किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यात आलेल्यांना हिंदू धर्मात परत आणण्याचे अभियान सुरू ठेवण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात समान नागरी संहिता अमलात आणण्यात यावी. जात आणि धर्म कोणताही असो, प्रत्येक दाम्पत्याला केवळ दोन मुलेच असावी, असा नियम असायलाच हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19795

Posted by on Jan 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2215 of 2453 articles)


=सोनियांचे प्रदेश कॉंगे्रस समित्यांना पत्र= नवी दिल्ली, [१७ जानेवारी] - सततच्या पराभवांमुळे कॉंगे्रस पक्षात नेतृत्वाच्या मुद्यावरून कलह निर्माण झाला असतानाच, ...

×