Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » तोयबा, हाफिझविरुद्ध कारवाई करू

तोयबा, हाफिझविरुद्ध कारवाई करू

  • ओबामांच्या दरबारी शरीफ नरमले
  • संयुक्त निवेदनात दिली ग्वाही
  • काश्मीर प्रश्‍नी हस्तक्षेपास अमेरिकेचा नकार

Nawaz-sharifवॉशिंग्टन, [२३ ऑक्टोबर] – भारताला झुकविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दरबारी गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे स्वत:च तोंडघशी पडले. भारतासोबत चर्चा सुरू करण्याच्या पाकच्या पुढाकाराचे आम्ही स्वागत करतो. पण, पाकने आधी भारतविरोधी दहशतवादी कारवाया करणार्‍या व्यक्ती आणि संघटनांना नेस्तनाबूत करावे, अशा कठोर शब्दात ओबामा यांनी खडसावल्यानंतर लष्कर-ए-तोबया, अन्य दहशतवादी संघटना, तसेच भारताला नेहमीच पाण्यात पाहणारा तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदविरुद्ध आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसारच कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही शरीफ यांनी ओबामांना दिली.
अमेरिकेने ज्या गटांना आणि व्यक्तींना आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या यादीत टाकले आहे, त्यांची मुळीच गय करण्यात येणार नाही. दहशतवाद समूळ नष्ट करण्याचे वचन आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला दिले असून, त्याचे पालन करण्यात येईल, असे नवाझ शरीफ यांनी बराक ओबामा यांच्यासोबत गुरुवारी चर्चा केल्यानंतर सांगितले.
या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यातही शरीफ यांनी दहशतवाद समूळ नष्ट करण्याची हमी दिली आहे. ओबामा यांच्यासोबत चर्चा करताना शरीफ यांनी काश्मीरचे तुणतुणे वाजवून, द्विपक्षीय चर्चेसाठी भारतावर दबाव आणण्यात यावा. त्याचप्रमाणे भारतीय जवान सीमेवर वारंवार गोळीबार करीत असल्याने तणाव निर्माण झाला आहे. यावर चर्चा आवश्यक असल्याने भारतावर अमेरिकेनेच दबाव टाकावा, असे साकडे घातले. तेव्हा, पाकच्या या पुढाकाराचे ओबामा यांनी समर्थन केले. सोबतच, पाकच्या भूमीत आ़श्रयास असलेले दहशतवादी भारताविरोधात सातत्याने कारवाया करीत आहेत. त्यांना तत्काळ आवर घाला आणि द्विपक्षीय संबंध सुरळीत होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करा, अशा शब्दात ओबामा यांनी सुनावले. यामुळे नवाझ एकदम ‘शरीफां’सारखे बोलू लागले.
भारत-पाक संबंधांत काश्मीर हाच मुख्य मुद्दा असल्याने तो सोडविण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी, अशी विनंतीही शरीफांनी केली. पण, हा द्विपक्षीय मुद्दा असल्याने अमेरिका त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असे ओबामा यांनी स्पष्ट केले. एकट्या पाकने आम्हाला विनंती करून चालणार नाही. दोन्ही देशांनी संयुक्तपणे यासाठी आमच्याकडे येणे आवश्यक आहे, असेही ओबामा यांनी त्यांना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25272

Posted by on Oct 24 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1302 of 2458 articles)


नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] - गेल्या काही दिवसात लेखक आणि विचारवंतांच्या झालेल्या हत्येचा निषेध करत या हत्येच्या निषेधात आपले पुरस्कार ...

×