Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘तो’ प्रकार राष्ट्रविरोधीच : गडकरी

‘तो’ प्रकार राष्ट्रविरोधीच : गडकरी

gadkari-nitinनवी दिल्ली, [२ मार्च] – इशरत जहॉं ही लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब असल्याचे माहीत असतानाही केवळ भाजपाला, विशेषत: नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी पूर्वीच्या संपुआ सरकारने जे काही केले, तो प्रकार देशद्रोहाचाच होता, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
केंद्रीय गुप्तचर संस्थांनी इशरत आणि तिच्या साथीदारांबाबत तत्कालीन केंद्र सरकारला अहवाल दिल्यानंतर केवळ राजकीय फायद्यासाठी कॉंग्रेसने विशेषत: पी. चिदम्बरम यांनी त्यात राजकीय बदल केले. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपाला बदनाम करण्यासाठी कॉंगे्रस आणि या पक्षाच्या नेत्यांनी राष्ट्रीय सुरक्षाही पणाला लावली. हा देशद्रोहच होता, असे गडकरी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
अतिरेकी आणि दहशतवादी संघटनांना कॉंग्रेस कोणत्या मार्गाने मदत करीत होती, ही सत्यताच आता समोर आली आहे. इशरत आणि तिच्या साथीदारांना गुजरात पोलिसांनी चकमकीत ठार केले होते, त्यावेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. इशरत लष्कर-ए-तोयबाची मानवी बॉम्ब होती, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती. या प्रकरणाशी गुजरात सरकार, पोलिस अधिकारी, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याशी काहीही संबंध नाही. मुंबई हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीनेही इशरत दहशतवादी असल्याचे सांगितले आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26983

Posted by on Mar 3 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (783 of 2453 articles)


=सुब्रमण्यम स्वामी यांची चौकशीची मागणी= नवी दिल्ली, [१ मार्च] - कॉंगे्रसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री पी.चिदम्बरम यांचे पाकच्या लष्कर-ए-तोयबा ...

×