Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘तो’ मजकूर हटविणारे चिद्‌म्बरम् : पिल्लई

‘तो’ मजकूर हटविणारे चिद्‌म्बरम् : पिल्लई

=इशरत जहॉं चकमक प्रकरण=
chidambaram-gk-pillaiनवी दिल्ली, [२८ फेब्रुवारी] – इशरत जहॉं चकमक प्रकरणात २००९ साली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले पी. चिदम्बरम् यांनीच शपथपत्रातील ‘तो’ मजकूर वगळला, जेणेकरून इशरतचे लष्कर-ए-तोयबाशी असलेले संबंध उघड होणार नाहीत, असा आणखी एक धक्कादायक खुलासा माजी गृहसचिव जी. के. पिल्लई यांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
जी. के. पिल्लई कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या कार्यकाळात गृहसचिव होते आणि यापूर्वी त्यांनी केलेले खुलासे बघता इशतरला निर्दोष ठरविण्यासाठीच कॉंग्रेस सरकारने प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. तत्कालीन गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी सहसचिवांकडून इशरत जहॉंची फाईल मागवली होती आणि याप्रकरणीच्या शपथपत्रात बदल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. शपथपत्रात बदल केल्यानंतरच ही फाईल आपल्याकडे आली होती, असे पिल्लई यांनी एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.
संपुआ सरकारने सर्वोच्च न्यायालयात आधी जे शपथपत्र सादर केले होते त्यामध्ये इशरत आणि तिचे तीन साथीदार (जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, जीशना जौहर व अमजद अली राणा) तोयबाच्या स्लीपर सेलचे सदस्य असल्याचे म्हटले होते. गृह मंत्रालयाने हे शपथपत्र दाखल केले होते. पिल्लई यांनी केलेल्या खुलाशावर चिदम्बरम् यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
केवळ सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले शपथपत्रच नव्हे तर २००९ साली गुजरात उच्च न्यायालयात यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातही राजकीय स्तरावर बदल करण्यात आला होता, असाही दावा पिल्लई यांनी केला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26946

Posted by on Feb 29 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (796 of 2453 articles)


=डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा आरोप, उद्या ठरणार भवितव्य= कोलंबिया, [२८ फेब्रुवारी] - अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ...

×