Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » त्यागींची ईडीकडूनही कसून चौकशी

त्यागींची ईडीकडूनही कसून चौकशी

s p tyagiनवी दिल्ली, [५ मे] – व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील घोटाळ्याचा तपास करणार्‍या सीबीआयने सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी वायुसेनाप्रमुख एस. पी. त्यागी यांची गुरुवारी कसून चौकशी केली.
एस. पी. त्यागी सकाळी अकराच्या सुमारास येथील ईडीच्या विभागीय कार्यालयात दाखल झाले. त्यागी यांची चौकशी करण्यासोबतच अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांचे बयाण नोंदविले जाईल, असे ईडीच्या सूत्राने याबाबत माहिती देताना सांगितले. याच प्रकरणात सीबीआयने गेले तीन दिवस त्यागींची चौकशी केली. मात्र, ईडीने त्यागींना चौकशीसाठी पाचारण करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इटलीच्या मिलान येथील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर त्यागींची चौकशी करणे क्रमप्राप्त आहे, असेही सूत्राने सांगितले. मिलान न्यायालयाच्या निर्णयात अनेकदा त्यागींचे नाव आले आहे, हे याठिकाणी उल्लेखनीय.
या खरेदी व्यवहारात त्यागी यांनी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरसाठी निर्धारित उंची कमी केली जेणेकरून ऑगस्टा वेस्टलॅण्डला यासाठी निविदा सादर करता येईल, असा त्यांच्यावर आरोप आहे. एस. पी. त्यागी यांनी ३१ डिसेंबर २००५ रोजी वायुसेनाप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला होता व २००७ साली ते सेवेतून निवृत्त झाले. ईडीने याप्रकरणी २०१४ साली प्राथमिक चौकशीची नोंद केली असून, अवैध सावकारी प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यागींसह १४ जणांची नावे आहेत.
संरक्षण मंत्रालय, वित्तीय संस्थांना पत्र
व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यात कोडमध्ये असलेली संशयितांची नावे उघड करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ईडीने संरक्षण मंत्रालय, आयकर विभाग आणि एफआययू यांच्याकडून माहिती मागितली आहे. या प्रकरणात नावे येत असलेले अधिकारी आणि इतरांची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्या सेवाकाळात ऑगस्टा वेस्टलॅण्ड प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आलेल्या संरक्षण मंत्रालय आणि वायुसेनेतील दहा आजी-माजी अधिकार्‍यांच्या संपत्तीची माहिती ईडीने मागितली आहे. याशिवाय या प्रकरणाशी संबंध असलेल्या काही संशयितांचे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक यासंबंधी माहिती देण्याची विनंती आयकर विभाग व आर्थिक गुप्तचर संस्थेला करण्यात आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28190

Posted by on May 6 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (371 of 2453 articles)


=अवैध स्थलांतरितांनाही देशाबाहेर हाकलणार= वॉशिंग्टन, [५ मे] - अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाल्याची अधिकृत घोषणाच होणे बाकी असलेले ...

×