Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » त्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी

त्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी

=पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सचा पाठिंबा नाकारला=
jammu-kashmir-map-6श्रीनगर, [१४ जानेवारी] – जम्मू-काश्मीरमध्ये लोकप्रिय सरकार स्थापन करण्यात निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सने दिलेला पाठिंबा स्वीकारण्यास मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपी हा पक्ष फारसा उत्सुक नसून, त्या पक्षाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करण्यापेक्षा राज्यपाल राजवट बरी, अशी भूमिका त्या पक्षाने घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने नॅशनल कॉन्फरन्सच्या विरोधात मतदान केले आहे आणि अवघ्या १५ जागा निवडून आलेला तो पक्ष सरकार स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही, असे पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. केवळ सत्ता हस्तगत करणे हा आमचा मुळीच उद्देश नाही. याउलट जम्मू-काश्मिरात शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यास आमचे प्राधान्य आहे. फक्त सरकारच स्थापन करायचे असते तर पीडीपीने यापूर्वीच तसा दावा सादर केला असता, असेही नईम यांनी सांगितले. नॅशनल कॉन्फरन्सने राज्यपाल एन. एन. व्होरा यांना पत्र लिहून सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपीला पाठिंबा असल्याचे कळविले आहे आणि सरकार स्थापन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याशी सल्लामसलत करण्याची विनंती केली आहे. सरकार स्थापन करण्याबाबत उघडपणे कोणतेही चर्चा सुरू नसली तरी अनौपचारिक वार्तालाप सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19711

Posted by on Jan 15 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2234 of 2452 articles)


=१५०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - आयटी क्षेत्रात संपूर्ण जगभरात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस या कंपनीचे ...

×