Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ‘त्या’ एक कोटीबाबत कॉंग्रेसने खुलासा करावा

‘त्या’ एक कोटीबाबत कॉंग्रेसने खुलासा करावा

डॉ. संबित पात्रा यांची मागणी
Sambit Patraनवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – कॉंग्रेसची प्रकाशन कंपनी असलेल्या यंग इंडियाच्या मुद्यावरून भाजपाने कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. काळा पैसा पांढरा करण्याचा व्यवसाय असलेल्या डोटेक्स मर्कडाईज कंपनीकडून यंग इंडियाने एक कोटी रुपये उधार घेतल्याचा आरोप भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबिता पात्रा यांनी केला आहे.
एक कोटीच्या भ्रष्टाचाराचे हे प्रकरण फार मोठे नसले, तरी यात गुंतलेला काळा पैसा हा टू-जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा किंवा ‘जिजाजीं’चा (रॉबर्ट वढेरा) आहे का, याचे उत्तर कॉंग्रेसने दिले पाहिजे, अशी मागणी पात्रा यांनी केली.
ज्यावेळी डोटेक्सने १ कोटी रुपये उधार म्हणून यंग इंडियाला दिले, त्यावेळी केंद्रात संपुआचे सरकार होते, याकडे लक्ष वेधत डॉ. पात्रा म्हणाले की, २३ सप्टेंबर २०१४ ला यंग इंडियाच्या संचालक मंडळाची बैठक सोनिया गांधींच्या निवासस्थानी म्हणजे १०, जनपथला झाली होती. या बैठकीत हे एक कोटी रुपये परत करण्याची मुदत एक वर्षाने वाढवून देण्याची विनंती करण्यात आली होती.
या घटनेनंतर आयकर खात्याने डोटेक्स मर्केडाईजची चौकशी केली असता, अनेक घोटाळे उघडकीस आले. आमची कंपनी काळा पैसा पांढरा करण्याचे काम करीत असल्याची कबुली डोटेक्सच्या मालकाने दिली असल्याचा आरोप पात्रा यांनी केला.
या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स आहेत, कोणत्याही कंपनीत जेव्हा कोणाचे ७६ टक्के शेअर असतात, तेव्हा तो कंपनीचा अधिकृत मालक असतो, याकडे पात्रा यांनी लक्ष वेधले. आपल्या आरोपाच्या समर्थनार्थ डॉ. पात्रा यांनी कागदपत्रेही सादर केली.
कॉंग्रेसने मात्र भाजपाने केलेले आरोप खोडून काढले आहेत. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत आपला पराभव स्पष्टपणे समोर दिसत असल्यामुळे नैराश्यातून भाजपा असे आरोप करीत असल्याचे कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. एसोसिएटेड जर्नलने आर.पी. गोयनका यांच्या कंपनीकडून १४ टक्के व्याजाने एक कोटी रुपये घेतले होते आणि ते परतही केले, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले. आता त्या कंपनीवर काही आरोप होत असतील, तर त्याचा असोसिएटेड जर्नलशी काय संबंध पोहोचतो, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25283

Posted by on Oct 24 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1293 of 2453 articles)


सिंचनाचे ८०० कोटी पाण्यात १०८ बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार भुजबळ परिवारासह, तटकरे आणि पवारांवर होणार कारवाई मुंबई, [२३ ...

×