Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » ‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची नावे जाहीर करा

‘त्या’ कॉंग्रेस नेत्यांची नावे जाहीर करा

=रविशंकर प्रसाद यांचे ऍण्टोनींना आव्हान=
ravi-shankar-prasad-2नवी दिल्ली, [२६ एप्रिल] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात कोणत्या कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता, याचा अधिकृत खुलासा माजी संरक्षण मंत्री ए. के. ऍण्टोनी यांनी करावा, असे खुले आव्हान केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिले.
संसदभवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर सौद्यात भ्रष्टाचार झाला होता, दलाली दिली गेली होती, याची कबुली ऍण्टोनी यांनी संरक्षण मंत्री असताना लोकसभेत दिली होती. या घोटाळ्यात सहभागी असणारा कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई होईल, असे आश्‍वासनही ऍण्टोनी यांनी त्यावेळी दिले होते. त्यामुळे या घोटाळ्यात कोणत्या कॉंग्रेस नेत्यांचा हात होता, याची माहिती ऍण्टोनी यांना निश्‍चितपणे असली पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्या कॉंग्रेस नेत्यांची नावे आता देशासमोर जाहीर केली पाहिजे.
इटली येथील न्यायालयाने या खरेदी प्रकरणात लाच दिल्याच्या आरोपावरून ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यासह दोघांना शिक्षा सुनावली आहे. लाच देणार्‍यांना तर शिक्षा झाली आहे, पण लाच घेणार्‍यांना अजूनपर्यंत शिक्षा झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात लाच कोणाला मिळाली त्यांचीही नावे समोर आली पाहिजे, आणि त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी प्रसाद यांनी केली.
इटलीच्या न्यायालयाने आपल्या निकालपत्रात लाच देणार्‍यांना शिक्षा ठोठावताना लाच घेणार्‍यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे, त्यामुळे या प्रकरणात कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग आहे की नाही, हे ऍण्टोनी यांनी स्पष्ट केले पाहिजे. त्यावेळी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची घोषणाही करण्यात आली होती, मात्र सीबीआयला चौकशी करू देण्यात आली नाही. सीबीआय चौकशीत जाणीवपूर्वक अडथळे आणण्यात आले, असा आरोपही प्रसाद यांनी केला.
याप्रकरणी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयातर्फे चौकशी सुरू असून ती प्रगतिपथावर आहे, याकडे लक्ष वेधत रविशंकर प्रसाद म्हणाले की, संपुआच्या कार्यकाळात चौकशीचा फक्त देखावा करण्यात आला. या खरेदी व्यवहारात भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची मोठी साखळी असून अनेक उच्च पदस्थांचा यात सहभाग आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28010

Posted by on Apr 27 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (432 of 2453 articles)


=साठा फक्त १७ टक्के= मुंबई, [२६ एप्रिल] - राज्यात पडलेल्या दुष्काळाने यंदा जलस्थिती अतिशय बिकट बनली असून जलाशयांतील उपयुक्त पाण्याचा ...

×