Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘त्या’ लघुपटाचे प्रसारण रोखणार

‘त्या’ लघुपटाचे प्रसारण रोखणार

=राजनाथसिंह यांची संसदेत ग्वाही, प्रसारण, परराष्ट्र मंत्रालय व बीबीसीला निर्देश=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [४ मार्च] – १६ डिसेंबर २०१२ रोजीच्या दिल्लीतील भीषण सामूहिक बलात्कारातील दोषीने बीबीसी लघुपटाला दिलेल्या मुलाखतीचे प्रसारण आपले सरकार कदापि होऊ देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिली. तत्पूर्वी, सर्वच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या मुलाखतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहात प्रचंड संताप व्यक्त केला.
अशा घटनांवरून जर कुणी आपला व्यावसायिक लाभ साध्य करीत असेल, तर तो प्रकारही आम्ही मान्य करणार नाही, असे सांगताना राजनाथसिंह म्हणाले की, तिहारमधील कैद्याच्या मुलाखतीची परवानगी कशी देण्यात आली, याचेच मला आश्‍चर्य वाटते. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही या मुलाखतीचे प्रसारण रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश आपण सूचना व प्रसारण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासोबतच बीबीसी या वृत्तवाहिनीलाही दिले आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाही, यासाठी विद्यमान कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या मुलाखतीमुळे केवळ संसदेलाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच धक्का बसला आहे. ही बाब खरोखरच लाजीरवाणी आहे. ही मुलाखत देशात आणि विदेशात कुठेही प्रसारित होणार नाही, याची काळजी आपले सरकार घेणार आहे, असेही राजनाथसिंह म्हणाले.
तत्पूर्वी, या मुद्यावरून राज्यसभेत विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. अशा प्रकारच्या मुलाखतींना परवानगी देणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी केली. तर सपा सदस्यांनी सभात्याग केला. यावेळी सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन राजनाथसिंह म्हणाले की, गृह मंत्रालयानेच जुलै २०१३ मध्ये या मुलाखतीला परवानगी दिली होती.
तिहारच्या डीजीपीला समन्स
दरम्यान, राजनाथसिंह यांनी तिहार कारागृहाचे महासंचालक आलोक कुमार वर्मा यांना समन्स बजावून बोलावून घेतले आणि या मुलाखतीची परवानगी कशी व केव्हा मिळाली होती, याविषयीची माहिती जाणून घेतली. यावेळी वर्मा यांनी बाहेरून लोकांना आत येण्यासाठी असलेल्या कार्यपद्धतीविषयी त्यांना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21118

Posted by on Mar 5 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1972 of 2453 articles)


=४३,१६१ कोटींचे उत्पन्न मिळणार= नवी दिल्ली, [४ मार्च] - सरकारने आज बुधवारपासून दूरसंचार स्पेक्ट्रमच्या ‘ई-लिलावा’ची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘टू-जी’ ...

×