Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » थरूर-तरारचे छायाचित्र सार्वजनिक

थरूर-तरारचे छायाचित्र सार्वजनिक

tharur-tararनवी दिल्ली, [१३ जानेवारी] – पत्नी सुनंदा पुष्करच्या हत्या प्रकरणामुळे सध्या अडचणीत सापडलेले वरिष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबतचे एक छायाचित्र नुकतेच सार्वजनिक झाले असून, यामुळे थरूर यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
थरूर आणि मेहर तरार यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून थरूर दाम्पत्यामध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण झाल्याची जोरदार चर्चा होती. सुनंदा पुष्करच्या संशयास्पद मृत्यूनंतरही यासंबंधी बरीच चर्चा झाली. सुनंदाची हत्या झाल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी थरूर आणि गरज पडल्यास मेहर तरार यांची चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. नुकतेच सार्वजनिक झालेले दोघांचे छायाचित्र दुबई येेथे जून २०१३ मध्ये टिपण्यात आले आहे. मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी मेहर तरारसोबत सुनंदाचे ट्विटर युद्ध रंगले होते.
जून २०१३ मध्ये थरूर आणि मेहर तरार यांनी तीन रात्री दुबईत एकत्र घालविल्याची माहिती मिळाल्यापासून सुनंदा खूप तणावात होती, अशी साक्ष मृत्यूच्या काही मिनिटे आधी सुनंदाशी बोललेल्या प्रख्यात पत्रकार नलिनी सिंग यांनी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर दिलेल्या साक्षीत म्हटले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी हे छायाचित्र समोर आले आहे, हे विशेष.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19678

Posted by on Jan 14 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2242 of 2453 articles)


गुवाहाटी, [१३ जानेवारी] - भारताची महिला मुष्टियोद्धा आणि ऑलिम्पिक पदक विजेती एमसी मेरी कोम २०१६ साली ब्राझिलच्या रिओ दी जनेरोमध्ये ...

×