Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » दंतेवाड्यात जवानांच्या हत्येवर जेएनयूत जल्लोष झाला होता

दंतेवाड्यात जवानांच्या हत्येवर जेएनयूत जल्लोष झाला होता

=अभाविपचा स्पष्ट आरोप=
abvpनवी दिल्ली, [६ मार्च] – छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यातील चिंतालनार गावाजवळ नक्षलवाद्यांनी एप्रिल २०१० मध्ये केलेल्या शक्तिशाली हल्ल्यात सीआरपीएफचे ७६ जवान शहीद झाले होते, त्यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) जल्लोष करण्यात आला होता आणि माकप-भाकप समर्थित विद्यार्थी संघटनांनी या जल्लोषावर कुठलाही आक्षेप घेतला नव्हता, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही सदस्यांनी केला आहे.
दंतेवाड्यात सुमारे दोनशे नक्षल्यांनी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफच्या तुकडीवर चहूबाजूंनी हल्ला केला होता. यात सीआरपीएफची संपूर्ण एक तुकडीच नष्ट झाली होती. याबाबतची माहिती मिळताच जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला होता आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांचे नेते व अन्य कार्यकर्ते शांतपणे हा तमाशा पाहात होते. तेव्हा या डाव्या संघटनांनी आवाज का उठविला नव्हता, असा सवाल अभाविपच्या प्रसिद्धी विभागाचे सदस्य आणि जेएनयूचे माजी विद्यार्थी साकेत बहुगुणा यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची निर्मिती असलेल्या भारतीय राज्यघटनेनुसारच या देशाचे कामकाज चालेल. कार्ल मार्क्स, लेनिन किंवा हिटलरचा सिद्धांत आम्ही कदापि मान्य करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अफजल गुरू आणि मकबूल बटच्या समर्थनार्थ जर कुणी नारे देत असतील, तर त्यांना आमच्या प्रखर विरोधाचा सामना करावाच लागेल. देश तोडण्याची भाषा आम्ही कदापि मान्य करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27065

Posted by on Mar 6 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (751 of 2452 articles)


=अरुण जेटलींचा राहुल गांधींवर हल्ला= वृदांवन, [६ मार्च] - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देत, देश तोडण्याची भाषा बोलणार्‍यांचे समर्थन ...

×